तलाठी सर्कल निलंबित तहसीलदारांना शोकेज,वाळू तस्करीवर कडाडले महसूल मंत्री विखे पाटील

Ahmednagar Breaking News
0
तलाठी सर्कल निलंबित तहसीलदारांना शोकेज,वाळू तस्करीवर कडाडले महसूल मंत्री विखे पाटील
अहमदनगर प्रतिनिधी:-बेकायदेशीर वाळू तस्करी अजिबात खपवून घेतली जाणार नाही याबाबत कठोर पावले उचलण्याचे निर्देश यापूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.अवैध वाळू तस्करी होत असेल तर त्या गावातील तलाठी सर्कल यांना निलंबित केले जाईल तसेच संबंधित तहसीलदारांना कारणे दाखवा नोटीस बजावत विचारणा केली जाईल या शब्दात राज्यातील वाळू तस्करीवर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कोरडा ओढला आहे.शुक्रवार दि. २३/०९/२०२२  रोजी जिल्हा दौऱ्यावर असलेल्या महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्ह्यात अतिवृष्टी वादळ वारे आणि पावसामुळे खरीप पिकांच्या झालेल्या नुकसानीचा तसेच पशुधनावरील त्वचारोग असलेल्या लंबी संदर्भातील उपायोजना आणि सद्यस्थितीचा आढावा घेतला. या आढावा बैठकीनंतर महसूल मंत्री विखे पाटील यांनी उपस्थित पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी राज्यातील वाळू तस्करी कदापी खपवून घेतली जाणार नसल्याचाच एक प्रकारे त्यांनी इशारा दिला आहे. वाळू अवैध वाहतूक आणि अवैध उपसा रोखण्याबाबत यापूर्वीच आपण राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले आहेत यावरही काही ठिकाणी वाळू तस्करी आढळली तर जबाबदारी निश्चित करून कारवाई केली जाईल. सध्या अनेक ठिकाणची लिलाव प्रक्रिया थांबली आहे वाळूच्या लिलाबाबत येत्या महिनाभरात धोरण निश्चित करून निर्णय घेतला जाईल. हा लंबी या पशुधनावरील त्वचारोगाच्या संदर्भात माहिती देताना विखे पाटील म्हणाले देशातील इतर राज्यांच्या तुलनेत लंबी बाबत महाराष्ट्रात अधिक नियोजन पूर्वक उपायोजना केल्या आहेत. राज्यात लंपी बाबत लसीचा कोणताही तुटवडा नाही याचा निर्वाळा देत विखे पाटील म्हणाले राज्यात आज पर्यंत 36 लाख 29 हजार लसीकरण करण्यात आले आहे हा लसीकरण योग्य असलेल्या पशुधनापैकी 63% पशुधनाचे लसीकरण करण्यात आले आहे. राज्यात 75 लाख लसी उपलब्ध आहे. राज्यातील 30 जिल्ह्यातील 266 तालुक्यातील 1666 गावात लंबी चा प्रादुर्भाव झालेला आहे. बाधित पशुधनाची राज्यातील संख्या 19 १६० इतकी आहे. नगर जिल्ह्यात आजपर्यंत 1658 पशुधन बाधित झाले आहे यापैकी 54 पशुधनाचा मृत्यू झाला आहे जिल्ह्यात नऊ लाख 158 पशुधन लसीकरणास योग्य आहे यापैकी जिल्ह्यातील सहा लाख 51 हजार पशुधनाचे लसीकरण करण्यात आले आहे. लंपी उपचाराबाबत लस्सी औषध याचा कोणताही तुटवडा नाही हे सर्व उपचार राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना मोफत स्वरूपात देण्यात आले आहेत. राज्यातील पशुसंवर्धन विभागात पशुवैद्यक व इतर अनेक पदे रिक्त आहेत येत्या महिनाभरात या पदांची भरती प्रक्रिया विभागीय आयुक्तांच्या पातळीवर सुरू करण्यात येईल असा निर्वाळा देखील विखे पाटील यांनी दिला. बाधित झालेल्या पशुधनाचे उपचारासाठी कॅम्प सुरू करण्याची मागणी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केली आहे. आशा कॅम्प सुरू करण्यास कोणी पुढे येत असतील तर त्याबाबत परवानगीचे अधिकार जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहेत असे देखील त्यांनी नमूद केले.


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top