मुल्ला कटर गॅंगचे दोन सदस्य मालेगावातून डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाकडून जेरबंद
श्रीरामपूर प्रतिनिधी:- श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या गु.र. नं.666/2022 भादवि कलम 363 (अ), 368, 370(अ),पोक्सो,3,4,5, पिटा ॲक्ट 4,5,6,7, अ.जा.ज.अ. प्र.का.क 3(1),(w)(i),(ii),3(2),(v),(3)(2)(5a) प्रमाणे गुन्ह्यातील पाहिजे आरोपी प्रशांत उर्फ पप्पू दादासाहेब गोरे व सचिन मधुकर पगारे हे दोघे मालेगाव येथे असलेबाबत तांत्रिक विश्लेषणाद्वारे निष्पन्न केले त्यानुसार पोलीस पथकाकडून आज पहाटे त्यांना जेरबंद करण्यात आले आहे.
बलात्कार करून, वेश्याव्यवसाय करिता विक्री करणे,जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेणे,आणि मिळणाऱ्या पैशावर जगणे यांसारखे गंभीर आरोप त्यांच्यावरती होते यापूर्वी सदर गुन्ह्यात चार आरोपींना अटक करण्यात आलेली आहे.सदरची कारवाई मा.श्री.मनोज पाटील पोलीस अधीक्षक,मा.स्वाती भोर अप्पर पोलीस अधीक्षक,Dysp संदीप मिटके,PI.हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली API बोरसे,फुरकान शेख,गौतम लगड,रमिज अत्तार,गणेश गावडे यांनी केली आहे.