डॉ.विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील
विद्यार्थ्यांना कॅम्पस इंटरव्ह्युमध्ये 10.50 लाखांचे पॅकेज.
नगर प्रतिनिधी - विळद घाट येथील डॉ.विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात माहिती तंत्रज्ञान विभागात शेवटच्या वर्षातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यामध्ये सचिन आचार्य (10.48लाख रू.-टीया कंपनी), जान्हवी खंडेलवाल (9लाख रू.- इंटॅलीपॅट कंपनी), अथर्व भणगे (4लाख रू.-हेक्सावेअर कंपनी), ऐश्वर्या पाठक (4.50लाख रू.-मग्ना कंपनी), अभिषेक लांडगे (4लाख रू. कॅपजेमिनी कंपनी), अभिजित जाधव ( 4लाख रू.-झेनसार कंपनी), दिव्या क्यातम (3.65लाख रू.-एचसीएल कंपनी), प्रियंका लालगे (3.50लाख रू .-विप्रो कंपनी) या आठ विद्यार्थ्यांची कंम्पसमधून निवड झाली.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल विद्यार्थी व पालक यांचा महाविद्यालयाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने महाविद्यालयामध्ये डेप्युटी डायरेक्टर (टेक्नि.) प्रा.सुनिल कल्हापुरे व प्राचार्य डॉ. उदय नाईक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी विभागप्रमुख डॉ.दिपक विधाते आदि उपस्थित होते.
या मुलाखती दरम्यान विद्यार्थ्यांची प्रथम योग्यता चाचणी घेण्यात आली. त्यानंतर तांत्रिक चाचणी आणि प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे निवड करण्यात आली. या मुलाखतीच्या यशस्वीतेसाठी ट्रेनिंग अॅीण्ड प्लेसमेंट ऑफिसर प्रा.सुदर्शन दिवटे तसेच शिक्षण समन्वयक प्रा. गणेश डहाणे यांनी प्रयत्न केले.
डॉ.विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय हे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्याकडे लक्ष देतेय, त्याचबरोबर विद्यार्थ्यांमधील व्यक्तीमत्व विकास, तांत्रिक कौशल्य विकास व संभाषण कौशल्य तसेच विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढविण्यासाठी सतत प्रयत्नशील असते, असे प्रा.सुनिल कल्हापुरे यांनी सांगितले.
या यशाबद्दल चेअरमन ना.राधाकृष्ण विखे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी खा.डॉ.सुजय विखे पा., संस्थेचे सेक्रेटरी (टेक्नि.) पी.एम.गायकवाड यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.