प्रभाग 2 मधील 5 हजार लाभार्थ्यांचा आयुष्यमान भारत योजनेमध्ये समावेश - खा.डॉ.सुजय विखे.
नगर प्रतिनिधी - केंद्र सरकारच्या विविध योजना या सर्वसामान्य लोकांच्या कल्याणासाठी असतात. प्रत्यक्षात त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी नागरिकांना विश्वासात घेवून आयुष्यमान भारत योजना देखील यशस्वीपणे माजी नगरसेवक निखिल वारे राबविण्याचा प्रयत्न करतात. हे प्रभाग 2 मधील पाच हजार लाभार्थ्यांचा या योजनेत समावेश झाला यावरुन दिसते. लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध झाली आहे. नगरीकांनी आपली नावे शोधून कार्ड बनविण्यासाठी स्वत:हून पुढे यावे, असे प्रतिपादन खा.डॉ.सुजय विखे यांनी केले आहे.
प्रभाग क्र.2 मध्ये निखिल वारे यांच्या पुढाकारातून ही योजना नागरिकांच्या सहकार्यामुळे यशस्वी होत असून, कार्ड बनविण्याचे काम सुरु करण्यात आले, असून त्याला प्रतिसाद मिळाल्यामुळे आज प्रत्यक्षात नागरिकांना कार्ड देताना आनंद होत असल्याचे डॉ.विखे यावेळी म्हणाले.
श्री.वारे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून खा.विखे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना कार्ड वाटप करण्याचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी नगरसेवक सुनिल त्र्यंबके, विनित पाउलबुधे, बाळासाहेब पवार, ज्येष्ठ नागरिक सुधाकर देशपांडे, हेमंत बल्लाळ, प्रकाश गुंफेकर, सुर्यकांत झेंडे, मच्छिंद्र तुवर, बिभिषण अनभुले, एकनाथ खिलारी, योगेश पिंपळे, संजय कांडेकर, कुलदीप भिंगारदिवे, अनिकेत चेमटे, अजय हिवाळे, माऊली गायकवाड आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलतांना श्री.वारे यांनी योजनेचे महत्व सांगितले. लाभार्थ्यांला पाच लाखांपर्यंत प्रतिवर्ष मोफत विमा भेटणार असून नगरमधील नामवंत रुग्णालयांचा यात सहभाग असल्याने मोफत उपचार, मेडिकल सुविधा, आयसीयू उपचार देखील मिळतील. ज्या लाभार्थ्यांचा समावेश आहे, त्यांची यादी माझ्या कार्यालयात उपलब्ध असून, आपली नावे सोधून आपले आरोग्य कार्य तयार करण्यासाठी सहकार्य करावे, तसेच ज्यांची नावे समाविष्ट करायची आहे. त्यांनी संपर्क साधावा, पुढील काळात ती यादी घेतली जाईल. तरी नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री.वारे यांनी केले.योजना यशस्वी करण्यासाठी नगरसेवकांसह रविंद्र शिंदे, गणेश माने, पंकज कल्याणकर, राम तिवारी तसेच कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.