प्रभाग 2 मधील मनपा कर्मचाऱ्यांना मिठाईचा गोडवा देऊन सन्मान.

Ahmednagar Breaking News
0

 प्रभाग 2 मधील मनपा कर्मचाऱ्यांना मिठाईचा गोडवा देऊन सन्मान.

सफाई कर्मचारी हे नागरिकांसाठी आरोग्यदूत-सुनिल त्र्यंबके.


नगर - वर्षभरातील सर्व ऋतुंमध्ये प्रामाणिकपणे सणा-वारांच्या दिवशी सुद्धा सफाईचे काम करताना वेळप्रसंगी नागरिक व नगरसेवकांचा रोषाला सामारे जाऊन काम करणारे मनपा कर्मचारी हे नागरिकांसाठी खरे आरोग्यदूत आहेत, असे गौरवोद्गार नगरसेवक सुनिल त्र्यंबके यांनी काढले.

प्रभाग 2 मधील मनपातील कर्मचार्यांचा साई-संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानच्यावतीने मिठाईचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक सुनिल त्र्यंबके, विनित पाउलबुधे, निखिल वारे, बाळासाहेब पवार आदि उपस्थित होते. यावेळी पाणी पुरवठा विभागााचे कैलास महामुनी, स्चच्छता निरिक्षक ऋषीकेश वाल्मिक, राजेंद्र सानप, केअर टेकर राजू भिसे तसेच कचरा गाडी चालक, सफाई कर्मचारी महिला उपस्थित होत्या.

पुढे बोलतांना त्र्यंबके म्हणाले, सावेडी उपनगरामधील सर्वात मोठा प्रभाग 2 ची ओळख असून, यामध्ये मनपा कर्मचारी लोकसंख्येच्या मानाने कर्मचारी कमी असूनही हे कर्मचारी तरीही काम करुन प्रभागात मुलभुत सुविधा चोख पुरवत आहेत. अशा कर्मचार्यांना मिठाईचा गोडवा देऊन सन्मान करण्यात वेगळे समाधान वाटते.

नगरसेवक विनित पाउलबुधे, निखिल वारे, बाळासाहेब पवार यांनी देखील या कर्मचार्यांच्या कामाची स्त्युती केली. विस्ताराने मोठा असलेल्या या प्रभागाची 40 हजार लोकसंख्या असून 12 कर्मचारी काम करतात. त्यामुळे विस्कळीतपणा होतो. मनपाकडे कर्मचारी वाढवण्यासाठी आम्ही प्रशासनाकडे पाठपुरावा करतो. कर्मचारी देखील वेळोवेळी मागणी करतात तेव्हा हा प्रश्न आयुक्तांनी सोडवावा, असे श्री.पवार यांनी सांगितले.

प्रास्तविकात प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश पिंपळे यांनी वर्षभर काम करणाऱ्या नागरिकांसाठी आरोग्यदूत असलेल्या या कर्मचार्यांचा सन्मान करणे आमचे कर्तव्य आहे. या उद्देशाने मिठाई वाटप करण्यात येते. 

याप्रसंगी बबलू सूर्यवंशी, अश्विन सोनवणे, विनोद शिंदे, यशवंत घोरपडे, सचिन शिंदे, सुमित वैराळ, सिद्धांत कोहेर, अमोल चव्हाण, पुष्पा भालेराव, कमल भालेराव, मंजु कलोसिया, सुशिाला जगधने, सखुबाई वाघचौरे, शोभा लोखंडे, सागर पुलगम, रितेश रजपुत, नाना कराळे, बाळासाहेब फुलसौंदर, नारायण घोरपडे, रमेश राहिंज, बाबासाहेब मोरे, एकनाथ पाचारणे, संजय पवार, विठ्ठल येमूल, राजू इंगळे, गणेश डुकरे, भरत पवार, कुमार त्र्यंबके आदि उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top