अहमदनगर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने हुतात्मा प्राप्त झालेले अधिकारी,अंमलदार यांना अभिवादन

Ahmednagar Breaking News
0

अहमदनगर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने हुतात्मा प्राप्त झालेले अधिकारी,अंमलदार यांना अभिवादन.

नगर, प्रतिनिधी : भारतीय सैन्य दलात आणि पोलीस दलात हुतात्म प्राप्त झालेले अधिकारी, अंमलदार यांचे स्मृतीस्थळास अभिवादन करुन 21 गोळ्या झाडुन मानवंदना अहमदनगर जिल्हा पोलीस दलाचे वतीने देण्यात आली.भारतीय सैन्य दलात शहिद झालेल्या किंवा पोलीस दलात मृत्युमुखी पडलेल्या अधिकारी व अंमलदार यांचे स्मृतीस 21 ऑक्टोंबर रोजी मानवंदना दिली जाते.

अहमदनगर जिल्हा पोलीस दलाचे वतीने भारतीय सैन दलातील देशाचे रक्षणा करीता शहिद झालेल्या अगर पोलीस दलातील आपले कर्तव्य बजावीत असतांना मृत्युमुखी पडलेल्या अधिकारी व अंमलदार यांचे स्मृतीस्थळास अभिवादन करुन मानवंदना या कार्यक्रमाचे आयोजन पोलीस मुख्यालय अहमदनगर येथे करण्यात आले.

सदर कार्यक्रमास सेवानिवृत्त अपर पोलीस महासंचालक व सध्या राज्य मानवी हक्क आयोगाचे सदस्य असलेले मा. श्री. भगवंतराव मोरे, मा. श्री. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी साहेब, अहमदनगर, मा. श्री. मनोज पाटील साहेब, पोलीस अधिक्षक, अहमदनगर, मा. श्री. सौरभ कूमार अग्रवाल, अपर पोलीस अधिक्षक, अहमदनगर व मा. श्री. मेघश्याम डांगे, पोलीस उपअधिक्षक (गृह), अहमदनगर व जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. सदर कार्यक्रमा वेळी हुतात्मा झालेल्या 261 अधिकारी व अंमलदार यांना अहमदनगर जिल्हा पोलीस दलाचे वतीने 21 गोळ्या झाडुन (फायर करुन) मानवंदना (सलामी) देण्यात आली. सदर कार्यक्रमास अहमदनगर जिल्हा पोलीस दलातील 20 पोलीस अधिकारी व 200 पेक्षा अधिक पोलीस अंमलदार उपस्थित होते.

हुतात्मा स्मृतीस्थळास मानवंदना कार्यक्रमावेळी मा. जिल्हाधिकारी साहेब, अहमदनगर व मा. पोलीस अधिक्षक साहेब, अहमदनगर यांनी हुतात्मा झालेल्या अधिकारी व अंमलदार यांचे बाबत मनोगत व्यक्त करुन श्रध्दाजंली अर्पण केली.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top