अहमदनगर दक्षिण मधून दसरा मेळाव्याला जाण्यासाठी शिंदे गटाची जोरदार तयारी,२५ बससह शंभर चारचाकी जाणार दसरा मेळाव्याला,छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून होणार रवाना

Ahmednagar Breaking News
0

 अहमदनगर प्रतिनिधी.अहमदनगर दक्षिण मधून दसरा मेळाव्याला जाण्यासाठी शिंदे गटाची जोरदार तयारी,२५ बससह शंभर चारचाकी जाणार दसरा मेळाव्याला,छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून होणार रवाना.


अहमदनगर प्रतिनिधी:-मुंबई येथे ५ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या दसरा मेळाव्याला अहमदनगर मधून जाण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट यांच्या कार्यकर्त्यांची तयारी झाली असून दसरा मेळाव्यासाठी ५ ऑक्टोंबर रोजी अहमदनगर दक्षिण मधून २५ बस आणि नगर शहरातून 100 फोर व्हीलर जाणार आहे.अहमदनगर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून नगर तालुक्यातील भाळवणी या ठिकाणी जमा होणार असून सर्वांना सोबत घेऊन माळशेज घाट मार्गे मुंबईला जाणार आहे.अशी माहिती दक्षिण जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.यावेळी शहरप्रमुख दिलीप सातपुते,संपर्कप्रमुख सचिन जाधव,बाबुशेठ टायरवाले,नगरसेवक संग्राम शेळके, सुनील लालबोंद्रे यांसह शिवसैनिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top