होलसेल फटाका मार्केट सर्वात कमी दरामुळे पूर्ण राज्यात प्रसिद्ध- श्रीनिवास बोजा.
नगर प्रतिनिधी – दिवाळी सण जवळ आल्याने नागरिकांची खरेदीची लगबग व तयारी सुरु झाली आहे. दिवाळीला फटाक्यांना विशेष महत्व आहे. नगर मध्ये कल्याण रोडवर अहमदनगर फटाका व्यापारी असोसिएशनचे जिल्ह्यातील एकमेव होलसेल फटाका विक्री मार्केट सुरु झाले आहे. याठिकाणी ३१ येथे स्टॉल उभारण्यात आले असून सुरक्षितेची पूर्ण काळजी घेण्यात आली आहे. श्रीविशाल गणपती मंदिराचे पुजारी संगमनाथ महाराज यांचे शिष्य आदित्यनाथ महाराज यांच्या हस्ते फीत कापून फटाका विक्री मार्केटचे व प्रवेशद्वाराचे उद्घाटन झाले. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा, सचिव संतोष बोरा, उपाध्यक्ष सोमनाथ रोकडे, सहसचिव अरविंद साठे, कार्याध्यक्ष सुरेश जाधव आदींसह सदस्य उपस्थित होते.
अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा म्हणाले, नगर शहरातील हे फटाका मार्केट जिल्ह्यातील एकमेव होलसेल मार्केट असून पूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे. सर्वात कमी दरात येथे फटाके मिळत असल्याने राज्यातील अनेक जिल्ह्यातील किरकोळ व्यापारी फटाके खरेदीसाठी याच मार्केटवर अवलंबून असतात. जिल्ह्य प्रशासनान दरवर्षी आम्हला सहकार्य करत असून एका महिना अगोदर फटाका विक्रीचे परवाने उपलब्ध करून देत आहेत. आमचे असोसिएशन वर्षभर सामाजिक जाणीवेतून काम करत असून गोरगरिबांसाठी उपक्रम राबवत असल्याने प्रशासनही आम्हाला सहकार्य करत आहे.
सचिव संतोष गांधी म्हणाले, ग्रामदैवत श्री विशाल गणेशाचा आमच्यावर आशीर्वाद असल्यानेच या मार्केटची दिवसेंदिवस प्रगती होत आहे. प्रशासनाच्या सहकार्याने तसेच आ.अरुण जगताप व आ.संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शना मुळे राज्यात सर्व प्रथम हे मार्केट सुरु होत आहे. ग्राहकांनी येथे होलसेल दरात मिळणारे सर्वप्रकारचे फटाके खरेदी करून आपल्या दिवाळीचा आनंद द्विगुणित करावा.
यावेळी आदित्यनाथ महाराज यांनी शुभेच्छा दिल्या. अरविंद साठे यांनी प्रास्ताविक केले, सुरेश जाधव यांनी आभार मानले. यावेळी फटका व्यापारी सुनील गांधी, देवीदास ढवळे, संजय सुराणा, विजय मुनोत,अमोल तोडकर, मयूर भापकर, दाजी गारकर, कराळे, उमेश क्षिरसागर, नंदू मुळे, गणेश विद्ये, सुनील टेकवाणी उपस्थित होते.