नवलेनगर, गजानन महाराज मंदिरात नगरसेवक रामदास आंधळे यांच्या स्थानिक विकास निधीतून पेविंग ब्लॉक.
मंदिरातील विकास कामामुळे परिसरात मंगलमय वातावरण निर्माण होऊन परिसर प्रसन्न होतो ➖️मा. महापौर. बाबासाहेब वाकळे. नगर प्रतिनिधी -आज नवलेनगर, गजानन महाराज मंदिर, गुलमोहर रोड येथील मंदिरात नगरसेवक रामदास आंधळे यांच्या विकास निधीतून पेविंग ब्लॉक लावण्याचा शुभारंभ मा. महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या हस्ते करण्यात आला.
माजी महापौर बाबासाहेब वाकळे म्हणाले मंदिरातील विकास कामामुळे परिसरात मंगलमय वातावरण निर्माण झाले याचा मनातून आनंद होतो.तसेच गजानन महाराज मंदिरामध्ये स्थानिक विकास निधीतून पेविंग ब्लॉक बसवले जातायेत ही तर देवाने मला सेवा करण्याची संधी दिली आहे व इथून पुढे या मंदिरासाठी जो काही निधी असेल भविष्यात तो उपलब्ध करून देण्याचा प्रामाणिकपणाने प्रयत्न करणार असे नगरसेवक रामदास आंधळे यावेळी म्हणाले.
यावेळी देविदास म्हस्के, बाळासाहेब जोगदंड ,राजन नवले, चंद्रशेखर गुंजाळ, अशोक गायकवाड, ऍड.मंगेश शोले, कुमार नवले, आदिनाथ म्हस्के, योगेश खरमाळे, विनोद भिंगारे, अभिजीत दरेकर, निशिगंध प्रभुणे, प्रसाद जोगदंड ,अशोक पालवे, रामदासी काका, निखिल जगदाळे, पुष्कर कुलकर्णी, ओजस नवले, जयंत रेखीदेवा उपस्थित होते.