डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतर घोषणेचा वर्धापन दिन.

Ahmednagar Breaking News
0

🔵.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतर घोषणेचा वर्धापन दिन.

🔵 नाशिक प्रतिनिधी (१३ ऑक्टो):-डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी येवल्यातील मुक्तीभुमी येथे धर्मांतराची घोषणा केली होती.त्या धर्मांतर घोषणेचा आज ८७ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.पंचशील ध्वजाचे ध्वजारोहन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नातसून अंजलीताई प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले.भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी १३ ऑक्टोबर १९३५ साली येवल्यातील मुक्तीभूमी येथे धर्मांतराची घोषणा केली.
        शहरातील या मुक्तीभूमीवर दरवर्षी धर्मांतर घोषणेचा वर्धापन दिन निमित्त सम्पूर्ण भारतातून मुक्तिभूमि येथे क्रांती स्तंभाला मानवंदना देण्यासाठी लाखोच्या संखेने भीमसैनिक येत असतात.यावर्षी धर्मांतर घोषणेचा ८७ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असून सकाळी क्रांतीस्तभास मानवंदना करत शहरातून धम्म रॅली काढण्यात येऊन पंचशील ध्वजाचे ध्वजारोहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नातसून अंजलीताई प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले.काल रात्री पासूनच भीम अनुयायांनी मुक्तीभूमी येथे येऊन क्रांतीस्तंभास मानवंदना दिली आहे.


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top