स्वामी विवेकानंद जनकल्याण प्रबोधिनी (ट्रस्ट) भव्य रक्तदान शिबिर

Ahmednagar Breaking News
0

 “करुनी दान रक्ताचे-फुलवा जीवन रुग्णांचे"

"स्वामी विवेकानंद जनकल्याण प्रबोधिनी (ट्रस्ट) भिंगार" ही सेवाभावी संस्था गेली २६ वर्षे विविध सामाजिक, शैक्षणिक, सेवाविषयक, समाजउपयोगी उपक्रम राबवित आहे.

       गेली २० वर्षे सातत्याने रक्तदान शिबीराचे आयोजन करून रुग्ण सेवेच्या कार्यात सहभागी होत आहेत. संस्थेच्या वतीने या शिबीरातून आजवर २४३८ इतक्या विक्रमी संख्येने रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे.संस्थेच्या या सेवाभावी रक्तदान कार्यास आपल्या सारख्या रक्तदात्यांनी सामाजिक जाणीवेतून सहभागी होवून शिबीरात निरपेक्ष भावनेने रक्तदान केले आहे.

      आपल्या सारखे सामाजिक बांधीलकी असणारे रक्तदातेच सहकार्य करीत असल्याने सलग २० वर्षे शिबीर उच्चांकी संख्येने यशस्वी झाले त्याची आम्हास कृतज्ञतापुर्वक जाणीव आहे. संस्था आपली अत्यंत ऋणी आहे.

       संस्थेच्या वतीने २१ वे रक्तदान शिबीर रविवार दि. १६/१०/२०२२ रोजी जनकल्याण रक्तपेढी नगरच्या सहकार्याने आयोजित केले आहे. आपण रक्तदाता या नात्याने रक्तदान करून सहभागी व्हावे.आपले स्नेही, मित्र परिवार यांनाही प्रोत्साहीत करावे, अशी संस्थेच्या वतीने विनंती करण्यात आली आहे.

        सर्व रक्तदात्यांचा उचित सन्मान करण्यात येईल.

 *स्वामी विवेकानंद जनकल्याण प्रबोधिनी (ट्रस्ट ) भिंगार.*

रविवार दि.ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ८ ते दुपारी २

ठिकाण : देशमुख सांस्कृतिक हॉल, पंपींग स्टेशन रोड, खळेवाडी, भिंगार, अहमदनगर

 सहकार्य.

स्व. चंद्रकांतजी मिश्रीलालजी भंडारी यांचे स्मरणार्थ श्रीमती शोभाताई चं. भंडारी व परिवार, भिंगार.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top