उड्डाणपुलाच्या पिलरवर एका संस्थेची जाहिरात लावून पिलर विद्रुप केल्या कारणाने कोतवालीत गुन्हा दाखल

Ahmednagar Breaking News
0

 उड्डाणपुलाच्या पिलरवर एका संस्थेची जाहिरात लावून पिलर विद्रुप केल्या कारणाने कोतवालीत गुन्हा दाखल.


नगर प्रतिनिधी:-नगर शहरातील उड्डाणपुलाच्या पिलरवर छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन चरित्र रेखाटनेचे काम सुरू झाले आहे.छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आजच्या पिढीला कायमस्वरूपी प्रेरीत राहावे यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे.एका शिक्षण संस्थने चक्क उड्डाणपुलाच्या पिलरवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या रेखाटलेल्या चित्राखाली जाहिरातीचे पोस्टर लावले आहे.मात्र उड्डाणपूल प्रशासनाने तात्काळ या संस्थेवर कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.
कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये कलम ४२७ प्रमाणे फिर्यादी राहुल विठ्ठल यांनी याबाबत फिर्याद दाखल केली आहे.अज्ञात आरोपीने उड्डाणपुलाची रंगोरंगोटी केलेल्या पिलर नंबर ६४ वर सिद्धी इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल, वक्रतुंड मार्केट जवळ, नगर पुणे रोड,केडगाव अहमदनगर यांच्या जाहिरातीचे छोटे बॅनर चिटकवून सदर कलरच्या रंगरंगोटीच्या कामाचे नुकसान केले आहे म्हणून सदर अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top