पाउलबुधे फार्मसी कॉलेजमध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा.
नगर प्रतिनिधी - आज समाजात वाचन संस्कृती रुजवण्यासाठी ग्रंथालयांची भुमिका महत्वाची असते. आपले स्वास्थ्य चांगले ठेवण्याबरोबरच ज्ञान वाढविण्याचे काम पुस्तक वाचनाने होते. मराठी भाषेचे संवर्धन झाले पाहिजे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.निलेश जाधव यांनी केले.
वसंत टेकडी येथील डॉ.ना.ज.पाउलबुधे फार्मसी कॉलेजमध्ये माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी करण्यात आली. याप्रसंगी प्राचार्य डॉ.जाधव यांनी विद्यार्थ्यांना वाचनामुळे यशाचे शिखर कसे गाठता येते हे अब्दुल कलाम यांच्या जीवनाचा प्रवास सांगून थोडक्यात सांगितले.
यावेळी डि.एड्.च्या प्राचार्या डॉ.रेखाराणी खुराणा, प्राचार्या सविता सानप रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य संदिप कांबळे, प्राचार्या अनुराधा चव्हाण, शिक्षकवृंद उपस्थित होते.
यावेळी प्राचार्य जाधव म्हणाले, डिजिटल युगातही वाचनाला महत्व आहे. वाचनाने शब्दसंग्रह वाढतो, आत्मविश्वास व सकारात्मकता वाढीस मदत होते. चांगले जीवन जगण्यासाठी ज्ञानार्जनासाठी वाचन हे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.
यावेळी प्राचार्या डॉ.खुराणा यांनी पाउलबुधे शैक्षणिक संकुलनात संस्था सर्व सोयी-सुविधा देत आहे. त्यामुळे अद्यावत असे वाचनालय असल्याने विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होत असतो. त्यामुळे कॉलेजची यशास्वी परंपरा राखण्यात आम्हाला यश मिळते, असे सांगितले. यावेळी डॉ.वेणू कोला यांनी मार्गदर्शनपर भाषण केले.
या उपक्रमाबद्दल संस्थेचे अध्यक्ष विनय पाउलबुधे, रघुनाथ कारमपुरी, साई पाउलबुधे यांनी कौतुक करुन शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन अपेक्षा कापसे यांनी केले तर आभार स्वाती कडनोर यांनी मानले.