प्रसिद्ध ज्योतिषतज्ञ तुषार घाडगे गुरुजी यांचा हर दिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा करण्यात आला.

Ahmednagar Breaking News
0


प्रसिद्ध ज्योतिषतज्ञ तुषार घाडगे गुरुजी यांचा हर दिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा करण्यात आला.

नगर,प्रतिनिधी: हर दिन मॉर्निंगग्रुपचे सक्रिय सभासद तसेच प्रसिद्ध ज्योतिषतज्ञ  तुषार घाडगे (गुरुजी) यांचा  वाढदिवस  आज  सकाळी भगवान गौतम बुद्ध जाॅगींग पार्क, भिंगार येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रथम नेहमीप्रमाणे  ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ  यांच्या नेतृत्वाखाली हास्य क्लब मोठ्या उत्साहात पार पडला. प्रसिद्ध ज्योतिषतज्ञ तुषार घाडगे (गुरुजी) यांचा परिचय व त्यांचे सामाजिक कार्य व ग्रुपसाठी योगदानाबद्दल सविस्तर माहिती संजय सपकाळ यांनी सांगितली.

             हर दिन मॉर्निंग ग्रुपच्यावतीने वाढदिवसानिमित्त मान्यवरांच्या हस्ते आणि ग्रुपमधील सदस्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.प्रसिद्ध ज्योतिषतज्ञ तुषार घाडगे (गुरुजी) यांचा सत्कार  ग्रुपचे सन्मानचिन्ह अशोकराव पराते व गणेश सातकर यांच्या हस्ते देऊन  व पुषपगुच्छ उद्योजक जालिंदर बेल्हेकर व नामदेवराव जावळे यांच्या हस्ते  देऊन करण्यात आले.

             प्रसिद्ध ज्योतिषतज्ञ  तुषार घाडगे (गुरुजी)यांना सर्व मान्यवर सभासदांनी शुभेच्छा दिल्या. सर्व सभासदांचे मनःपूर्वक आभार तुषार घाडगे गुरुजी यांनी मानले.  कार्यक्रमाची गोड सांगता करण्यात आली.

 

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top