संगमनेर शहरात जुगाराच्या अड्ड्यावर छापा

Ahmednagar Breaking News
0

संगमनेर शहरात जुगाराच्या अड्ड्यावर छापा.

संगमनेर प्रतिनिधी:-अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर शहरात नाशिक संगमनेर रोडवरील हॉटेल लकी शेजारील बिल्डिंगमधील जुगाराच्या अड्ड्यावर दि.2 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १.३० वा. सुमारास पोलिसांनी छापा मारला.या छाप्यात १,२१,५०० रुपये रोख रक्कम,३०,०००० रु. किमतीची स्विफ्ट कार,३०,००० रु. किमतीची paishan मोटरसायकल,६००० रुपये किमतीची कावासाकी मोटरसायकल,३०,००० रुपये किमतीची paishan मोटरसायकल,६०,००० रुपये किमतीची पल्सर मोटरसायकल,असा एकूण ५,४७,५०० रुपये रोख रक्कम व वाहने पोलिसांनी जप्त केले आहे.पोलीस नाईक यमना जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुरनं. ८४५/२०२२ म.जु.का.क.४ व ५ प्रमाणे दाखल करण्यात आला आहे.संगमनेर शहर व संगमनेर तालुका पोलिसांनी केलेली ही संयुक्त कामगिरी गौरवास्पद आहे. परंतु संगमनेर मध्ये राजरोसपणे चालणारे कत्तलखाने, गुटखा,पत्त्याचे क्लब व इतर अवैधधंदे यांना अभय कोणाचे हा प्रश्न निर्माण होतो.



Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top