कर्जत तालुक्यात पत्नी आणि तिच्या नातेवाईकांच्या जाचास कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या.
कर्जत,प्रतिनिधी (२२ ऑक्टोबर):-पत्नी आणि तिच्या नातेवाइकांच्या मानसिक त्रासास कंटाळून एका शिक्षकाने आत्महत्या केल्याचा प्रकार कर्जत तालुक्यात शुक्रवारी (दि.२१) पहाटेच्या सुमारास घडला असून याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात एकूण १८ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
यापैकी ११ जणांना कर्जत पोलिसांनी अटक केली.संदीप दत्तात्रय शेटे (वय ३५, रा. कोळवडी,ता.कर्जत) असे आत्महत्या केलेल्या प्राथमिक शिक्षकाचे नाव आहे.शुक्रवारी (दि. २१) पहाटेच्या सुमारास कोळवडी (ता. कर्जत) येथील प्राथमिक शिक्षक संदीप दत्तात्रय शेटे यांचा पत्नी व तिचे नातेवाईक आणि इतरांनी मानसिक छळ केला. फिर्यादीवरून पत्नीच्या व तिच्या नातेवाईकांच्या छळास कंटाळून तसेच काही दिवसांपूर्वी पत्नीच्या नातेवाइकांकडून झालेल्या मारहाणीतून वैफल्यग्रस्त झाल्याने संदीप यांनी चार पानांची चिठ्ठी लिहीत घरातील छताच्या पंख्याला दोरीच्या साह्याने गळफास लावून आत्महत्या केली,असे फिर्यादीत म्हटले आहे.याप्रकरणी मयत संदीप शेटे यांचे बंधू ज्ञानदेव दत्तात्रय शेटे यांनी कर्जत पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक ५०६,३४ सह भादंवि कलम ३०६,५०४,३ (१) (आर) (व्ही ए) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.