सहाय्यक फौजदाराची गळफास घेऊन आत्महत्या नगर जिल्ह्यातील घटना

Ahmednagar Breaking News
0

 सहाय्यक फौजदाराची गळफास घेऊन आत्महत्या नगर जिल्ह्यातील घटना.


अहमदनगर प्रतिनिधी (५ ऑक्टो):-सहाय्यक फौजदाराची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुःखद घटना विजयादशमीच्या दिवशीच घडली आहे.बेलवंडी पोलीस स्टेशनला कार्यरत असणारे सहायक फौजदार सुनील धोंडिबा मोरे वय ५० यांनी श्रीगोंदा शहरातील पेट्रोलपंपाजवळ त्यांच्या राहत्या घरी गळफास घेऊन स्वतःची जीवनयात्रा संपवली आहे.मोरे हे परिवारासह श्रीगोंदा येथे राहात होते.ते एक महिन्यांपासून मेडिकल रजेवर असल्याचे समजते. आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही.श्रीगोंदा पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.मयत मोरे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला आहे.पोलीस पुढील तपास करत आहेत.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top