पाईपलाईन रोड, दत्तनगरमध्ये सभा मंडपाचे भूमिपूजन

Ahmednagar Breaking News
0

पाईपलाईन रोड, दत्तनगरमध्ये सभा मंडपाचे भूमिपूजन.


नगर -  गेल्या अनेक वर्षांपासून शनी-मारुती व दत्त मंदिराच्या सभामंडपाची भाविकांनी केलेली मागणी प्रत्यक्षात पूर्ण होईल. अध्यात्मिक, धार्मिक वारसा असलेल्या या वसाहतीमध्ये लवकरच नवीन सभामंडप तयार होईल. यामुळे येथील मंदिराच्या लौकिकात भर पडणार आहे, असे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी केले.
पाईपलाईन रोडवरील दत्तनगरला सभामंडपाचे भूमीपूजन आ.जगताप यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक विनित पाउलबुधे, सुनिल त्र्यंबके, निखिल वारे, बाळासाहेब पवार, अवधूत ट्रस्टचे अध्यक्ष रमेश दानवे, उपाध्यक्ष रामचंद्र खेडकर, सचिव सुरेश माळवदे, सहसचिव सुनिल जगताप, विजयसिह परदेशी, नंदकुमार सोन्नीस, चंद्रकांत तागड, सतीश वांढेकर, कुलदिप भिंगारदिवे, सचिन लोटके, महेश लोटके, प्रसाद साळी, हर्षल विधाते आदिंसह नागरिक उपस्थित होते.
आ.जगताप पुढे म्हणाले, दोन वर्षापूर्वी हा प्रस्ताव मंजूर झाला होता, पण कोरोनामुळे निधी उपलब्ध होत नव्हता. आता गेल्या महिन्यापासून सावेडी उपनगरातील मुख्य रस्ते, विविध विकास कामे सुरु झाली आहेत.
प्रभागातील नगरसेवक प्रश्न सोडविण्यासाठी नेहमीच तप्तरता दाखवतात, त्यामुळे नागरिकांना तक्रारीस वाव मिळत नाही, असे ट्रस्टचे अध्यक्ष रमेश दानवे यांनी सांगितले.
प्रास्तविक विजयसिंह परदेशी यांनी केले. सूत्रसंचालन चंद्रकांत तागड यांनी केले. प्रभाग दोनच्या चारही नगरसेवकांनी आपल्या मनोगतामधून आ.संग्राम जगताप यांच्या विकास निधीतून तसेच आमच्या निधीतून नागरिकांच्या समन्वयामुळे विविध प्रश्न मार्गी लागले. आदर्शवत प्रभाग करण्याचा आमचा मानस असल्याचे बाळासाहेब पवार यांनी सांगितले.
यावेळी रहिवासींच्यावतीने आ.जगताप व नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. विजय परदेशी यांनी सर्वांचे आभार मानले. 

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top