पाथर्डी पोलिसांनी ऊसतोडणी मजुराचा खून करणाऱ्या आरोपीस केले गजाआड.

Ahmednagar Breaking News
0

 पाथर्डी पोलिसांनी ऊसतोडणी मजुराचा खून करणाऱ्या आरोपीस केले गजाआड.



करंजी प्रतिनिधी (२२ ऑक्टोबर):-मुकादमाने केलेल्या मारहाणीत मृत्यू झालेल्या खडांबे (ता.राहुरी.जि अहमदनगर) येथील संजय माळी यांच्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी पाथर्डी पोलिसांनी अटक केला आहे. मात्र यातील दुसरा आरोपी फरार झाला असून पोलिस त्याच्या मागावर आहेत.

               खडांबे येथील संजय काशिनाथ  माळी व सोमनाथ पांडुरंग दळवी (वय ३९) या ऊसतोडणी कामगारास मुकादम अशोक जाधव (रा. हारेवाडी,ता.आष्टी,जि.बीड) यांनी उचल दिली होती; परंतु,संजय माळी यांना काही कारणामुळे ऊसतोडणीसाठी कारखान्यांवर जाण्यास उशीर झाला.याचा राग मनात ठेवून मुकादम अशोक जाधव व सोबतचा दुसरा आरोपी  यांनी त्यांना त्यांच्या खडांबे गावी जाऊन आणले.अशोक जाधव यांच्या हारेवाडी गावातील खोलीत ठेवून त्यांना काठ्यांनी जबर मारहाण केली.त्यातच संजय काशिनाथ माळी यांचा मृत्यू झाला.मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी संजय माळीचा जोडीदार हा फरार झाला.पांडुरंग दळवी यांना आरोपींनी सांगितले की संजय यांना दवाखान्यात घेऊन चाललो आहे,दुचाकीवर दोघांच्यामध्ये बसवून करंजी घाटात आणून कठड्यावरून संजय यांना त्यांनी खाली ढकलून दिले.सोमनाथ दळवी यास हे कोणाला सांगायचे नाही,अशी धमकी दोघा आरोपींनी दिली. सोमनाथ दळवीने घडलेली सर्व हकीकत पाथर्डी पोलिसांना सांगितली.

                 पाथर्डी पोलिसांनी सोमनाथ दळवी याच्या फिर्यादीवरून भादंवि कलम ३०२,२०१,३४२,५०६,३४ अन्वये गुन्हा दाखल केला.सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील,श्री.अजित पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पाथर्डी पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण,सपोनि/कायांंदे/प्रवीण पाटील,पोकॉ/अरविंद चव्हाण,सतीश खोमणे,किशोर पालवे,अमोल आंधळे,पोना/राम सोनवणे यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top