जेष्ठ नागरिकांचा बौद्ध संस्कार संघाच्यावतीने सन्मानचिन्ह देऊन गौरव.

Ahmednagar Breaking News
0

 जेष्ठ नागरिकांचा बौद्ध संस्कार संघाच्यावतीने सन्मानचिन्ह देऊन गौरव.


नगर,प्रतिनिधी (२० ऑक्टोबर):-चेतना लॉन्स मंगलकार्यालयात दरवर्षी प्रमाणेच वर्षावास उत्सव यावर्षीही (२०२२)  संपन्न झाला.यावेळी बौद्ध संस्कार संघाच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांना सम्मानचिन्ह देवून गौरव करण्यात आले.या उत्सवात मोठ्या प्रमाणात बौद्ध उपासकांची उपस्थिती होती.धार्मिक,तात्विक, सामाजीक व सांस्कृतिक विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.या उत्सवाचे २१ वे वर्षे होते,दरवर्षी समाजातून तन-मन-धनाने तत्पर धम्मकार्य करणारे उपासक,उपासीका यांची निवड केली जाते.या वर्षी निवड मंडळाचे सर्वोच्च उपासक भाऊसाहेब देठे तसेच वरिष्ठ उपासक वसंतराव मेढे,अरविंद शिंदे,एम.बी.साळवे,डॉ.रमेश भिंगारदीवे या मंडळींकडून जेष्ठ उपासक ॲड.बळीराम उके,जनार्दन बोरुडे,सुधाकर जाधव,विश्वासराव काकडे,सुनील होवाल,दिनकर कांबळे,या जेष्ठ उपासकांचा आणि जेष्ठ उपासिका लिलावती वि.पाचारणे,सविता ज.बोरुडे,विश्वमाधुरी उके,सुजाता सु.जाधव,कल्पना कांबळे,आशा सु. होवाल जेष्ठ उपासकांचा (सेवानिवृत आरोग्य संचालक पुणे ) डॉ.एस.एम.सोनवणे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्षिमा या ४ महिन्याच्या कालखंडात बौद्ध उपासक पवित्र ग्रंथ बुद्ध आणि त्यांचा धम्म" या ग्रंथावर तात्विक विषयावर अभ्यासपूर्वक चर्चा करतात,याच चर्चेतून धम्म समजून अनेक उपासकांचा एक संघ निर्माण झाला आहे असे मत सर्वोच्च उपासक भाऊसाहेब देठे यांनी यावेळी व्यक्त केले.यावेळी या उत्सवात पंचशील कैसेट सेंटरचे अनेक स्टॉल लावण्यात आले होते.बुद्धवंदना पुस्तक,फुले,शाहू,आंबेडकरांची सर्व पुस्तके,मूर्ती,पेन,किचन,झेंडे,तोरण,इत्यादी सर्व धम्म साहीत्याची उपासकांनी खरेदी केली.अशा या धम्म कार्यात जेष्ठ उपासक तसेच उपासिका यांनी चांगला प्रतिसाद दिला.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top