बाळासाहेबांची शिवसेनेच्या प्रवक्तेपदी संजीव भोर.
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांसमवेत सेनेत प्रवेश.
(नगर, प्रतिनिधी.) : शिवप्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष इंजि, संजीव भोरपाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला. तसेच त्यांची बाळासाहेबांची शिवसेनेच्या राज्य प्रवक्तेपदी नियुक्ती केल्याचे पत्र मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते देण्यातआले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी संजीव भोर यांनी कार्यकर्त्यांसह बाळासाहेबांची शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले. ते म्हणाले, भोर यांचे राज्यभरातील समर्थक व त्यांचा दांडगा संपर्क याचा पक्षाला निश्चितच फायदा होईल. ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहेबांचे विचार व धर्मवीर आनंद दिघेंची शिकवण आचरणात आणतील,अशी अपेक्षा शिंदे यांनी व्यक्त केली.
पक्षप्रवेशानंतर भोर म्हणाले, ज्या घटकांसाठी आजपर्यंत काम करत आलो त्या घटकांना न्याय देण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात करता येऊ शकेल, असा विश्वास आहे.बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षात प्रवेश करीत आहोत, असे ते म्हणाले. यावेळी स्वप्नील नागटिळक, निलेश मदन, राम झिने, बाबासाहेब भांड, राहुल गागरे,कैलास आवारी, मदन मोकाटे, भागवत कोटमाळे, अमोल चोथे, गोरक्षनाथ आढाव, अजित भोर, दीपक शिंदे,संपतराव दरेकर, तेजस पाटील,आदिनाथ चंद्रे, अमोल पाठक, सोमनाथ माने, संदीप सायंबर, राहुल गागरे,कैलास आवारी, प्रशांत जाधव, अरुण जाधव, रावसाहेब उघडे, तौफिक देशमुख, अण्णासाहेब भोर, दीपक शिंदे, सुनील काचोळे, रमेश पगडे,सर्जेराव शिंदे आदींनी प्रवेश केला.