तिरुपती बालाजीचे दर्शन घेऊन येत असताना नगर मधील भाविकांच्या गाडीला अपघात.
अहमदनगर, प्रतिनिधी.(31,ऑक्टोबर ) :30, ऑक्टोबर रोजी साधारण सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास तिरुपती बालाजीचे दर्शन घेऊन परत येत असताना रिंग रोड, हुबळी, कर्नाटक येथे आल्यावर चारचाकी वाहन आणि कंटेनरच्या अपघातात नागापूर येथील रहिवासी विठ्ठल भानुदास सप्रे. (वय 34) यांचा जागीच मृत्यू झाला, तसेच त्यांच्यासोबत असलेले तीनजण जखमी झाले. जखमींवर तेथील रुग्णालयात उपचार सुरू आहे.
अपघाताची माहिती समजतात नगरमधील त्यांचे सहकारी मित्र अमोल पुंड, दत्ता कातोरे, संदीप कातोरे, आप्पा पोकळे हे घटनास्थळी गेले.