श्रीराम भक्त हनुमान सत्संग मंडळातर्फे श्रीराम मंदिर,नवीपेठ येथील मंदिरातअन्नकूट महोत्सव.
श्रीराम भक्त हनुमान मंडळातर्फे श्रीराम मंदिराचे नवनिर्माण करण्यात आले आहे. आज होणाऱ्या कार्यक्रमा- निमित्त मंदिरात भव्य सजावट करण्यात आली आहे. मंदिरातील गाभाऱ्यात देवांच्या मूर्ती समोर देखील भव्य सजावट करून त्यामध्ये छप्पण भोग दाखवण्यात आले आहे. याची संपूर्ण जबाबदारी मंडळातील सर्व कार्यकर्ते पार पाडतात.
वर्षभर दर शनिवारी रात्री साडेआठ ते दहा वाजेपर्यंत श्री हनुमान चालीसा पठाण व भजन संध्या कार्यक्रम श्रीराम भक्त हनुमान सत्संग मंडळातर्फे आयोजित करण्यात येतो, त्यास मोठया प्रमाणात भाविकांचा सहवास लाभतो.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्रिपुरा पौर्णिमा निमित्त दीपोत्सव कार्यक्रम करण्यात येईल. त्याच दिवशी मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येईल असे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले.