सकल राजस्थानी युवा मंच.(ट्रस्ट)आणि महिला मंच.आयोजित कॅन्सरमुक्त महाराष्ट्र अभियान.
नगर,प्रतिनिधी.(10.ऑक्टोबर):अहमदनगर मधील सकल राजस्थानी युवा मंच.(ट्रस्ट)आणि महिला मंच.आयोजित कॅन्सर (कर्करोग)मुक्त महाराष्ट्र अभियान 11 ऑक्टोबर ते 13 ऑक्टोबर 2022 या कालावधीत आनंदधाम, अहमदनगर येथे सकाळी 10 वाजेपासून सुरू होईल.या शिबिरात मोफत कॅन्सर (कर्करोग)तपासणी करण्यात येईल.तरी जास्तीत जास्त लोकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा,असे आवाहन धनेश कोठारी अध्यक्ष सकल राजस्थानी युवा मंच तर्फे करण्यात आले आहे.
कर्करोग ही भारतासह जगासमोरची एक प्रमुख समस्या आहे. दरवर्षी लाखो लोकांना कर्करोगानं आपला जीव गमवावा लागतो. बदलती जीवनशैली, भेसळयुक्त आहार, व्यसनं आदी कारणांमुळे कर्करोगाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचं दिसून येतं.
भारतात दरवर्षी सुमारे १.१ दशलक्ष नवीन प्रकरणे नोंदवली जात आहेत. कर्करोगाच्या दोन-तृतीयांश प्रकरणांचे निदान शेवटच्या टप्प्यावर होते, ज्यामुळे रुग्णांची जगण्याची शक्यता कमी होते.योग्य वेळी निदान झाल्यास प्राथमिक अवस्थेतील कर्करोगाचा उपचार होऊ शकतो. नंतरचे उपचार अधिक खर्चिक आणि तुलनेनं कमी प्रभावी ठरतात. त्यामुळे सुरुवातीच्या स्तरांवर उपचार मिळाल्यास रुग्णाचा जीव वाचू शकतो.
कर्करोगाचं निदान व कर्करोगास कारणीभूत जीवनशैली टाळण्यासाठी जागरूकता निर्माण करणे ह्या उद्देशाने *11 ऑक्टोबर २०२२ ते 13 ऑक्टोबर २०२२* दरम्यान *"कैन्सर मुक्त महाराष्ट्र अभियान"* हा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे.
अखिल भारतीय जैन अल्पसंख्यक महासंघच्या अत्याधुनिक "मोबाइल कॅन्सर डिटेक्शन बस" च्या माध्यमातून व महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललितजी गांधी व संदीप जी भंडारी यांच्या विशेष सहकार्याने *महाराष्ट्र मध्ये किमान १५१ कॅन्सर तपासणी शिबिरांचे आयोजन करून किमान २१००० नागरिकांच्या मोफत कॅन्सर तपासणीचे उद्दिष्ट ठेवले आहे.* ज्या मधे स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग, प्रोस्टेट कर्करोग, तोंडाचा कर्करोग आणि ब्राँकायटिस कर्करोगाच्या तपासण्या होणार आहेत.
या अभियानातील मुख्य प्रायोजक ललित गांधी फाउंडेशन, सुर्यादत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, ऑल इंडिया जैन मायनोरिटी फेडरेशन हे आहेत. तसेच अभियानाचे सह आयोजक बडीसाजन युवक संघ,जैन कॉन्फरन्स युवा शाखा,महावीर चषक परिवार,जय आनंद फाउंडेशन हे आहेत.