अहमदनगर जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्वीकारला पदभार.
नगर,प्रतिनिधी (२२ ऑक्टोबर):- अहमदनगर जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी शनिवार २२ ऑक्टोबर रोजी पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला यावेळी पोलीस अधीक्षक राकेश ओला म्हणाले,नगर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करणार आहे.