पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील ऐन दिवाळीतही शेतकऱ्यांच्या बांधावर, नुकसान झालेल्या पिकांची केली पाहणी.

Ahmednagar Breaking News
0

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील ऐन दिवाळीतही शेतकऱ्यांच्या बांधावर, नुकसान झालेल्या पिकांची केली पाहणी.



अहमदनगर,प्रतिनिधी (२५ ऑक्‍टोबर):-परतीच्या पावसाने तसेच अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात शेती पिकांचे सर्वाधिक १०० टक्के नुकसान हे शेवगाव तालुक्याचे झाले असून नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच भरीव मदत मिळवून देण्यात येईल असे प्रतिपादन राज्‍याचे महसुल,पशुसंवर्धन,दुग्‍ध व्‍यवसाय विकास मंत्री तथा जिल्‍ह्याचे पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केले.

              शेवगांव तालुक्‍याच्‍या पूर्व भागातील बोधेगांव, बालमटाकळी,लाडजळगांव यांसह आदी भागांची पाहणी करून बालमटाकळी ग्रामपंचायत येथे आयोजित कार्यक्रमात ग्रामस्‍थांशी संवाद साधतांना श्री. विखे पाटील बोलत होते.यावेळी जिल्‍हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले,उपविभागीय अधिकारी देवदत्‍त केकान, जिल्‍हाध्‍यक्ष अरूण मुंढे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे, पिंपळगांवचे सरपचं संजय खेडकर, मुंगीचे सरपंच बबन भुसारी, बोधेगांवचे उपसरपंच नितीन काकडे, शेवगांवचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी, गटविकास अधिकारी महेश डोके, मंडळअधिकारी भाऊसाहेब खुडे आदी अधिकारी उपस्थित होते.

                 पालकमंत्री श्री. विखे पाटील म्‍हणाले, जे शेतकरी ई पीक पाहणी पासून वंचित राहिलेले आहेत त्यांना देखील सरसकट मदत देऊन ई पीक पाहणीचे अट शिथिल करून पीक विम्या संदर्भात लवकरच सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची जिल्हास्तरीय बैठक बोलवण्यात येईल. तसेच शेतकऱ्यांना सर्वाधिक मदत करण्याची भूमिका ही राज्य शासनाची राहील, अशा संकटकाळात शेतकऱ्यांमागे राज्‍य शासन खंबीरपणे उभे आहे. ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली नाही तो शेतकरी देखील पंचनाम्यापासून तसेच मदतीपासून वंचित राहणार नाही.असे त्‍यांनी यावेळी सांगितले.

              पालकमंत्री यांनी बोधेगांव येथील ग्रामदैवत बन्नोमाँ दर्ग्याला चादर अर्पण केली. तसेच तेथील शेतक-यांशी त्‍यांनी संवाद साधून त्‍यांच्‍या अडीअडचणी समजून घेतल्‍या. यावेळी महसूल विभाग, पोलीस विभाग, कृषी विभाग, शिक्षण, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण आदी विभागांचे अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्तविक उपसरपंच तुषार वैद्य यानी केले.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top