आर्थिक-सामाजिक परिस्थिती बदलण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही - व्याख्याते गणेश शिंदे.

Ahmednagar Breaking News
0

 आर्थिक-सामाजिक परिस्थिती बदलण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही - व्याख्याते गणेश शिंदे.



 नगर प्रतिनिधी - तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करा, पण ते करीत असतांना आहे, त्या परिस्थितीला सामोरे जा. आयुष्य खूप सुंदर आहे, त्याचा आनंद घेता आला पाहिजे. विद्यार्थ्यांना आर्थिक, सामाजिक परिस्थिती बदलायची असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते प्रा.गणेश शिंदे यांनी केले.
माजी नगरसेवक निखिल वारे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध शासकीय सेवा व स्पर्धा परिक्षांची तयारी करणार्या विद्यार्थी व पालकांच्या विशेष प्रबोधनासाठी ‘वेध भविष्याचा’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी आ.संग्राम जगताप, मनपाचे आयुक्त डॉ.पंकज जावळे, पोलिस उपअधिक्षक अण्णासाहेब जाधव, गणेश पाटील, गणेश बारगजे, प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन, नगरसेवक धनंजय जाधव, अमोल गाडे, सुनिल त्र्यंबके, विनित पाउलबुधे, बाळासाहेब पवार, प्रा.माणिक विधाते, विरोधी पक्ष नेता संपत बारस्कर, अविनाश घुले,बाबासाहेब वाकळे, सचिन जाधव, केमिस्ट असो.चे अध्यक्ष दत्ता गाडळकर, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष चेतन क्षीरसागर, अमोल लगड, सतीश शिंदे, कुलदीप भिंगारदिवे, अजय औसरकर, राहुल सांगळे, संजय ढोणे, अजय चितळे, नगरसेविका रुपालीताई वारे, संध्याताई पवार, अजय हिवाळे आदिंसह नागरिक मोठ्या संख्येंने उपस्थित होते.
प्रा.गणेश शिंदे यांनी आपल्या व्याख्यानामधून जीवनात स्पर्धा परिक्षेत यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रमाबरोबरच जिद्द, ध्येय कसे ठेवावे, हे अमिताभ बच्चन, सचिन तेंडूलकर यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. निखिल वारे राजकिय क्षेत्रात प्रामाणिक राहिले म्हणून त्यांना चांगले काम करण्याची संधी नागरिकांनी दिली. आ.संग्राम जगताप यांच्यासारख्या चांगल्या लोकप्रतिनिधींची साथ मिळाली. क्षेत्र कोणतेही असो प्रामाणिकपणे काम केल्यास यश हे नक्की मिळते, असे सांगितले.
आ.संग्राम जगताप यांनी निखिल वारे यांनी एक वेगळा उपक्रम राबवून तरुण कार्यकर्त्यांपुढे चांगला आदर्श ठेवला यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल होण्यास मदत होईल, असे ते म्हणाले.
प्रारंभी माजी नगरसेवक निखिल वारे यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत करुन विद्यार्थी, पालक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित रहिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. आपल्या मनोगतामध्ये त्यांनी राजकीय क्षेत्रात काम करतांना येणार्या अडचणी व प्रशासकीय क्षेत्रात काम करणार्या अधिकार्यांची मनस्थिती यावर आपले विचार व्यक्त केले. राजकिय मंडळी नाही म्हणायला व अधिकिरी तर हो म्हणायला शिकली तरी प्रश्न सुटतील, पण तसे घडत नाही, याची खंत त्यांनी व्यक्त केली.
यावेळी सावेडी उपनगरातील नगरसेवक, मनपाचे अधिकारी, कॉलेज मधील युवकवर्ग, मान्यवर व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी अनिकेत चेमटे, स्वप्नील वारे, सचिन वारे, रुपेश यादव, श्रीनिवास कासार, विनीत पोकळे, युवराज बार्शीकर, योगेश पिंपळे, प्रतिक तुवर, अमित वारे, आनंद झेंडे, स्वामी म्हस्के, बापु गायकवाड, सचिन गाडे आदींनी विशेष परिश्रम करून कार्यक्रम यशस्वी पणे पार पाडला. सूत्रसंचालन प्रा.जायभाय यांनी केले. शेवटी सर्वांचे हर्षद वारे यांनी आभार मानले. 



Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top