राष्ट्र सेविका समितीच्या नवरात्रोत्सवाची संचलनाने सांगता

Ahmednagar Breaking News
0

 राष्ट्र सेविका समितीच्या नवरात्रोस्तवाची संचलनाने सांगता.


 नगर प्रतिनिधी:-नवरात्रीत घरोघरी शक्तीची उपासना करून सामाजिक भान राखत समितीच्या  सेविकांनी आराधना केली.प्रत्येक सेविका जणु अष्टभुजेचे स्वरूप बनली होती.कोजागिरीच्या दिवशी दिनांक 9 ऑक्टोबर रोजी साई मंदिर पाच गोडाऊन जवळ, बँक कॉलनी शाहूनगर ,केडगाव येथे संचलनाने नवरात्रोत्सवाची सांगता झाली.विजयादशमी या समितिच्या स्थापना दिना निमित्त दसरा उत्सवाचे नियोजन केले होते.यानिमित्ताने दरवर्षी प्रमाणे यावर्षीही  सघोष पथसंचलन झाले.

यावर्षी प्रथमच 'केडगाव ' या शहराच्या उपनगरात, उत्सव आणि संचलन झाले. परिसरातील नागरिकांनी सुरेख रांगोळ्या आणि पुष्पवृष्टी ने स्वागत केले. एका चिमुरडीने स्व हस्ताक्षरातील फलक दाखवून भावना व्यक्त केली ते विशेष कौतुकास्पद !.संचलनात सहभागी होण्यासाठी गणवेश आणि पदावेश अनिवार्य  असल्याने आपापले गणवेश आणि पदवेश परिपूर्ण करून संचलनाची सिद्धता केली गेली.

गणवेश नसलेल्या सेविकाही मंगलवेशात  उत्सवात सहभागी झाल्या होत्या.ज्या उत्साहाने श्रीसूक्त उपक्रम झाला त्याच उत्साहाने संचलनात सहभागी होऊन एक रोमांचकारी अनुभव सेविकांनी तर  घेतलाच. परंतु केडगाव शाहू नगर भागातील नागरिकांसाठी  महिलांचे सघोष पथसंचलन हा अनोखा उपक्रम कौतुकाचा विषय ठरला.नगरमधील समितीच्या पाच शाखांनी आपापली जबाबदारी योग्य रीतीने पूर्ण केली.

केडगावची शाखा नव्याने सुरू झाली असली तरी तेथील सेविकांनी खूप परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला याबद्दल त्यांचे विशेष कौतुक.. या कार्यक्रमासाठी सौ.मधुबालाताई चोरडिया या यशस्वी उद्योजिका प्रमुख पाहुण्या म्हणून लाभल्या  त्यांनी समिती कार्यास शुभेच्छा देऊन या कार्यात सहभागी होण्याचे आश्वासन दिले. 

   उत्सवासाठी  सहकार बँक स्टाफ गृहनिर्माण संस्था,केडगाव चे मा.चेअरमन डाॅक्टर मुकुंद शेवगावकर आणि साईबाबा फाऊंडेशन बँक काॅलनी चे मा. अध्यक्ष श्री अजितजी कातोरे यांनी जागा उपलब्ध करून दिली. भूषणनगरचे नगरसेवक मा. विजयजी पठारे यांचे सहकार्य लाभले.  कार्यक्रमानंतरच्या अल्पोपाहार  श्री राहुलजी चिपाडे, निलेशजी चिपाडे, कुलकर्णी काका लोंढे आजोबा तसेच नगरसेविका मा.लताताई शेळके यांच्या सहकार्याने उपलब्ध झाला.मा.नगरसेविका.सुनीताताई कोतकर आवर्जून उपस्थित होत्या.संरक्षणाची जबाबदारी  पोलिस बंधूंनी घेतली होती. नेहमीप्रमाणेच संघबंधूंचेही सहकार्य होते.समितीच्या विभाग बौद्धिक प्रमुख स्वातीताई रानडे यांनी *स्वाधीनतेकडून  स्वतंत्रतेकडे* हा विषय आपल्या खास शैलीत सोपी उदाहरणे देऊन मांडल्याने श्रोते प्रभावित झाले.

या कार्यक्रमात वैयक्तिक गीत सौ.अनघा बिनिवाले यांनी म्हटले तर सांघिक गीत सौ. सुगंधा डिंगरे यांनी सांगितले.यावेळी शस्त्र पूजनाचा कार्यक्रम पण झाला.

वंदना काळे यांनी प्रास्ताविक केले हेमा गोसावी यांनी आभार मानले.

संपूर्ण वंदे मातरमने कार्यक्रमाची सांगता झाली.




Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top