जागतिक मानसिक आरोग्य सप्ताहानिमित्त साईदीप हॉस्पिटल तर्फे शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन.
नगर प्रतिनिधी (६ ऑक्टो):-दिनांक ४ ते १० ऑक्टोबर यादरम्यान सर्व जगामध्ये जागतिक मानसिक आरोग्य सप्ताहानिमित्त विविध जनजागृतीचे कार्यक्रम आयोजित केले जातात या सप्ताहाच्या अनुषंगाने जनसमान्यांमध्ये मध्ये असलेली मानसिक आरोग्याविषयीची अनास्था व तसेच विविध गैरसमज दूर होऊन मानसिक आजारांनी ग्रस्त असलेल्या व्यक्तींच्या तिची निगा इलाज व्यवस्थित व्हावेत व त्यांचे जीवनमान सुधारावे तसेच त्यांनी एक जबाबदार घटक म्हणून काम करावे या विविध उद्देशाने विविध कार्यक्रम राबवले जातात.साईदीप हॉस्पिटल अहमदनगर ही आपल्या अहमदनगरची एक अग्रगण्य आरोग्य सेवा संस्था आहे. परिपूर्ण आरोग्यासाठी शारीरिक आजाराचा इलाज याबरोबरच पेशंटच्या मानसिकतेचा विचार केला जावा तसेच मानसिक आजारांचे वाढते प्रमाण व्यसनाधीनता नैराश्य,निद्रानाश चिंता विकार,मानसिक तणावामुळे वाढत्या आत्महत्याचे प्रमाण,डिजिटल मोबाईल एडिक्शन,विविध प्रकारचे असंबद्धतेच्या विचारांचे आजार. या वरील सर्व उपचार साईदीप हॉस्पिटल येथील मानसोपचार विभागामध्ये उपलब्ध आहेत.अहमदनगर मधील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल पैकी मानसिक आजाराचे शासकीय अनुमती प्राप्त रुग्णालय हे साईदीप एकमेव आहे.येथे कार्यरत असलेला सुसज्ज मानसोपचार विभाग असून त्यात तीन मानसोपचार तज्ञ प्रशिक्षित समुपकदेशक उपलब्ध आहे. येथील वार्डमधील सर्व कर्मचाऱ्यांना योग्य ते प्रशिक्षण प्राप्त आहे. मानसिक साठी आवश्यक असलेल्या सर्व तपासण्या सीटीस्कॅन,एमआरआय स्कॅन तसेच मेंदू विकार तज्ञ मेंदूचे सर्जन आदी सर्व सोई साईदीप मध्ये एकाच छताखाली उपलब्ध आहेत.अति उत्तेजक असलेल्या व इतरांना धोकादायक ठरू शकणाऱ्या रुग्णांना त्यांच्या घरापासून ऍम्ब्युलन्स द्वारे आणण्यासठी सर्व प्रशिक्षित टीम येथे उपलब्ध आहे.सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार सर्व प्रकारच्या मानसिक आजारांचे इन्शुरन्स इतर शारीरिक आजाराप्रमाणेच व्हावे असे सर्व इन्शुरन्स कंपन्यावर बंधनकारक आहे. साईदीप येथे कॅशलेस किंवा क्लेम सुविधा उपलब्ध आहे. तसेच महाराष्ट्र पोलीस कल्याण योजना त्याचप्रमाणे ईसीएचएस, भारतीय रेल्वे व सीजीएचएस इत्यादी आरोग्य योजना अंतर्गत उपचार साईदीप येथे उपलब्ध आहेत.अशी माहिती साईदीप हॉस्पिटल चेअरमन डॉ.एस.एस.दीपक यांनी दिली.मानसिक आरोग्य सप्ताहानिमित्त साईदीप हॉस्पिटल तर्फे जिल्ह्यातील सर्व डॉक्टरांसाठी एक वैद्यकीय चर्चासत्र दिनांक 7 ऑक्टोबर शुक्रवार रोजी आयोजित केलेले आहे. याकार्यक्रमासाठी वैद्यकीय महाविद्यालय सायन मुंबई येथील प्रख्यात मानसोपचार तज्ञ व विभाग प्रमुख डॉक्टर निलेश शहा यांना निमंत्रित केलेले आहे.तसेच रविवार दिनांक ९ ऑक्टोबर रोजी सकाळी सहा वाजता भव्य मॅरेथॉनचे आयोजन केलेले आहे.ही मॅरेथॉन बालभवन रोड मानधना फॉर्म जवळ येथून सुरू होऊन ३ किलो मीटर व ५ किलोमीटर अशी दोन टप्प्यात होणार आहे.त्या मॅरेथॉन करता कोणतेही प्रवेश शुल्क नाही तरी सर्व लोकांनी या मॅरेथॉनमध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आव्हान साईदीप हॉस्पिटल तर्फे करण्यात आले आहे.या सप्ताहाच्या निमित्ताने मनोविकलांग व्यक्तींसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन साईदीप तर्फे करण्यात आले आहे अशी माहिती डॉ.अश्विन झालानी, मानसोपचार तज्ञ व संचालक साईदीप हास्पिटल यानी दिली.या वेळी साईदीप हॉस्पिटल चे सर्व संचालक ड़ॉ शाम केकड़े, डॉ.आर.आर.धूत,ड़ॉ.निसार शेख,ड़ॉ.रविन्द्र सोमाणी,डॉ.कैलाश झालानी,डॉ.हरमीत कथूरिया,डॉ. अनिल कुरहड़े,डॉ.इक़बाल शेख, ड़ॉ.संगीता कुलकर्णी, डॉ.किरण दीपक,डॉ.वैशाली किरण,डॉ.अनिकेत कुरहड़े, डॉ.कस्तूरी कुरहड़े,डॉ.पायल धूत,डॉ.भूषण खर्चे,डॉ. श्रीधर बधे,डॉ.गणेश सारड़ा,डॉ.साहिल शेख,साईदीप हेल्थ केयर ट्रस्टच्या अध्यक्षा सौ.नंदा सोमाणी,मुख्य प्रवर्तक सौ.ज्योति दीपक,सौ.रोहिणी कुरहड़े,सौ.अनिता झालानी.शोभा धूत,सौ.सुनीता देशपांडे,सौ.अंजू कथूरिया, व अन्य मान्यवर उपस्थित होते.