माहूरगड येथील रेणुका मातेच्या दर्शनासाठी दिवाळीच्या सुट्टीनिमित्त भक्तांचा महापूर.
( माहूर, जि.नांदेड प्रतिनिधी ) : साडेतीन शक्तीपीठांपैकी एक माहुरगड जिल्हा नांदेड येथील रेणुका मातेच्या दर्शनासाठी दिवाळीच्या सुट्टीनिमित्त भक्तांची खुप गर्दी झाली होती, असे माहूरगड मंदिरातील मुख्य पुजारी शुभम भोपी यांनी सांगितले.कोरोना काळानंतर ही पहिली दिवाळी आहे, त्यामुळे भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
आज पर्यंत देवीच्या दर्शनासाठी झालेल्या भक्तांची गर्दी पैकी गर्दीचा उच्चांक मोडणारी गर्दी झाली होती. नेहमी प्रमाणे देवीची सकाळी महापूजा आणि आरती करण्यात आली. त्यानंतर देवीला नैवेद्य महाप्रसाद दाखवण्यात आला.