आमदार संग्राम जगताप यांची अहमदनगर जिल्हा कुस्तीगीर संघाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड.

Ahmednagar Breaking News
0

आमदार संग्राम जगताप यांची अहमदनगर जिल्हा कुस्तीगीर संघाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड.


               नगर,प्रतिनिधी - नगर जिल्ह्यातील नामवंत मल्लांनी माझ्यावर अहमदनगर जिल्हा कुस्तीगीर संघाची जबाबदारी सोपवली आहे ती जबाबदारी सर्वांना बरोबर घेऊन यशस्वीपणे पार पाडू तुमच्या अनुभवांचा वारसा अंगीकारून जिल्ह्यातील कुस्तीमध्ये येणारी नवीन पिढी घडवायची आहे. कुस्ती क्षेत्राला आलेली मरगळ पुसून तालुकास्तरावर कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे.शहरी व ग्रामीण भागातील मल्लांना राज्य,राष्ट्रीय पातळीवर घेवून जाण्यासाठी स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. कुस्ती क्षेत्र चांगले आहे या क्षेत्रामध्ये तरुणांना जोडणे गरजेचे आहे कुस्ती क्षेत्रामध्ये करिअर करण्याच्या विविध संधी उपलब्ध झाल्या आहेत आता मुली सुद्धा कुस्ती क्षेत्र कडे वळू लागल्या आहे नगर जिल्ह्याचा देशामध्ये कुस्ती क्षेत्रामध्ये असलेला दबदबा पुन्हा एकदा दाखवायचा आहे दमदार पैलवान घडवायचे आहेत. अहमदनगर जिल्हा कुस्तीगीर संघ कुस्ती क्षेत्राला नक्कीच नावलौकिक मिळवून देऊ असे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी यावेळी केले.

 अहमदनगर जिल्हा कुस्तीगीर संघाच्या जिल्हाध्यक्षपदी आ. संग्राम जगताप याची निवड झाली तसेच नूतन कार्यकारणी चा सत्कार यावेळी संपन्न झाला. कार्याध्यक्षपदी आ. निलेश लंके, सहकार्य अध्यक्षपदी पै.अक्षय कर्डिले, मार्गदर्शक राजेंद्र फाळके उपाध्यक्ष महाराष्ट्र केसरी पै. अशोक शिर्के, उपाध्यक्षपदी महाराष्ट्र केसरी पै. गुलाब बर्डे, उपाध्यक्षपदी पै.रवींद्र वाघ, उपाध्यक्षपदी पै.मधुकर उचाळे, सचिव डॉ. संतोष भुजबळ, सहसचिव पै. प्रवीण घुले, खजिनदार पै. शिवाजी चव्हाण, कार्यकारी सदस्य पै. अर्जुन शेळके, उपमहाराष्ट्र केसरी पै. बबन काशीद, पै.शिवाजी कराळे, पै.नितीन काकडे, पै. अंकुश चत्तर,पै. युवराज करंजुले,पै. उमेश भागानगरे,पै. पांडुरंग गुंजाळ,पै. अफजल शेख,पै. नानासाहेब थिटे,पै. प्रमोद गोडसे,पै. नितीन आव्हाड,पै. सोमनाथ राऊत,पै. अतुल कावळे,पै. सुरज भुजबळ,पै. अजित वाघ,पै. संदीप कावरे,पै. धनंजय खर्से,पै. संदीप गायकवाड,पै. सचिन शिरसाट,पै. अमोल रोहकले,पै. सागर मासाळकर,पै. शंकर खोसे,पै. विष्णू खोसे,पै. दादा पांडुळे,पै. विठ्ठल लांडगे,पै.अमित गाडे,पै. मोहन गुंजाळ,पै. उस्मान कुरेशी,पै. किरण ठुबे याची निवड झाली.

         पै. प्रवीण घुले म्हणाले की, नगर जिल्ह्यातील ओरिजिनल सर्व पैलवानांनी एकत्रित येऊन अहमदनगर जिल्हा कुस्तीगीर संघाची स्थापना केली आपल्या सर्वांना कुस्ती क्षेत्रासाठी काम करायचे आहे कुस्ती क्षेत्रातील खेळाडूंच्या समस्या सोडवायचे आहे. क्रीडांगणे निर्माण करायचे आहे उत्कृष्ट पैलवान निर्माण व्हावे यासाठी प्रशिक्षकाची नेमणूक केली जाणार आहे आ. संग्राम जगताप यांच्यामुळे कुस्ती क्षेत्राला राज्यश्रेय मिळणार आहे. ते सर्वांना बरोबर घेऊन कुस्ती क्षेत्रामध्ये चांगले काम उभा करतील मा.आ. अरुणकाका जगताप व मा.मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी कुस्ती क्षेत्रासाठी चांगले काम उभे केले आहे असे ते म्हणाले.

    डॉ. संतोष भुजबळ यांनी अहमदनगर जिल्हा कुस्तीगीर संघाची स्थापना केली असून नवीन कार्यकारिणी जाहीर केली.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top