विठ्ठल बुलबुले यांचे तीस वर्षाचे कार्य व पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त विविध स्पर्धा.
नगर,प्रतिनिधी :सामाजिक कार्यकर्ते, माहिती अधिकाराचे प्रशिक्षक व प्रेरणादायी वक्ते विठ्ठल बुलबुले यांच्या 30 वर्षांच्या सामाजिक कार्याचा सन्मान व 50 व्या वाढदिवसा निमित्त वक्ता मंच, जिज्ञासा अकादमीच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अकादमीच्या संचालिका प्रा. संगीताताई गाडेकर,भैरवनाथ कन्स्ट्रक्शनचे संचालक अनिल जावळे व स्पर्धा प्रमुख श्रीकांत वंगारी यांनी दिली.
पहिली ते दहावीतील मुलामुलींसाठी अर्धकथा, वक्तृत्व, कविता, निबंध, चित्रकला अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. याची सुरुवात 14 ऑक्टोबर रोजी विठ्ठल बुलबुले यांच्या पन्नासाव्या वाढदिवसापासून होईल. 14 ऑक्टोबर 2022 ते 3 जानेवारी 2023 दरम्यान विविध शाळांतच या सर्व स्पर्धा होतील. या सर्व स्पर्धांना रोख बक्षिसे, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र स्पर्धकांना देण्यात येणार असल्याचे स्पर्धा समितीचे पीयूष मंडलेचा, प्रकाश कोटा,तिरमलेश पासकंटी, विकास गांधी,लक्ष्मण न्यालपेल्ली आदींनी सांगितले.स्पर्धेच्याआयोजन नियोजनात शिवानी शिंगवी, त्रिशाली तोटा,निकिता न्यालपेल्ली, प्रवीण कांबळे, नंदिनी गांधी, सविता कोटा, राजेंद्र बुलबुले, विशाखा तोटा, श्रीनिवास बुलबुले, केतन न्यालपेल्ली आदीं सहभागी आहेत. जास्तीत जास्त स्पर्धक विद्यर्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन स्पर्धा समितीच्या वतीने करण्यातआले. अधिक माहितीसाठी प्रकाश कोटे(मो. ९८८१९४५९१८) किंवा श्रीकांत वंगारी(मो. ९२७०९२७८८६) यांच्याशी संपर्क साधावा.
माहिती अधिकारात श्री. बुलबुले यांचे कार्य उल्लेखनीय आहे. त्या कायद्यातील विरोधात लोकसभेत आलेले विधेयक त्यांनी आंदोलन, परिसंवाद करून हाणून पाडले आहे. त्या कार्यासाठी त्यांना सजग नागरिक म्हणून पुरस्काराने सन्मानित केले आहे. अशा एकूण 30 वर्षांच्या समग्र सामाजिक कार्याचा गौरव म्हणून या स्पर्धा घेण्यात येणार आहेत.