संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात सर्व ग्रा.पं. यांनी सहभागी व्हावे - आशिष येरेकर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर.
अहमदनगर – ग्रामीण भागातील जनतेचे आरोग्यमान, जीवन स्तर उंचावण्यासाठी राज्य शासनाकडून विविध अभियान राबविण्यात येतात. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान पुन्हा अधिक जोमाने राबविण्यात येणार असून 11 ऑक्टोबर 2022 पासून या अभियानास सुरुवात झाली आहे. 15 नाव्हेंबर 2022 पर्यंत हे अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानात जिल्हयातील सर्व ग्रामपंचायतींनी सहभाग घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी केले
गावागावांत निर्माण होणा-या स्वच्छतेच्या नव्या सुविधा, नागरिकांचे स्वच्छतेबाबतीत होणारे मत परिवर्तन व स्वच्छतेच्या चळवळीत ग्रामीण भागातील सर्व ग्रामस्थांचा सक्रिय व सातत्यपूर्ण सहभाग घेणे हे संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाचे वैशिष्ट आहे. राज्यातील ग्रामपंचायती, तालुके व जिल्हयात स्वच्छतेच्या विविध पैलूतील एक सर्व समावेशक स्पर्धा राबवून त्यांच्या माध्यमातून ग्रामस्थांना प्रोत्साहित करुन स्वच्छतेच्या कार्यक्रमाचा आपलेपणा व महत्व पटवून देण्याकरीता राज्यात संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे असे आशिष येरेकर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितले
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्रात स्वच्छतेचा जागर निर्माण करणे, अभियानात समाविष्ट गावातील वैयक्तिक शौचालय, एक खड्डा ते दोन खड्डा करावयाची शौचालये, गावे हागणदारीमुक्त करावयाची कार्यवाही करावायाची आहे. स्वच्छतेच्या या महायज्ञात, नागरिक, कर्मचारी, तसेच लोक प्रतिनिधी, सक्रिय सहभाग नोंदवून संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात भाग घ्यावा असे आवाहन सुरेश शिंदे प्रकल्प संचालक यांनी केले.
स्वच्छ ग्राम स्पर्धा पुरस्कार
जिल्हा परिषद गट स्तरावर प्रथम ६० हजार रुपये, जिल्हास्तरावर प्रथम रू ६ लक्ष, द्वितीय रु ४ लक्ष, तृतीय रु 3 लक्ष . विभाग स्तरावर प्रथम रु१२ लक्ष, द्वितीय रु ९ लक्ष, तृतीय रु ७ लक्ष. राज्य स्तरावर प्रथम रु ५० लक्ष, व्दितीय रु ३५ लक्ष, तृतीय 30 लक्ष या शिवाय जिल्हा, विभाग व राज्य पातळीवर प्रथम, व्दितीय व तृतीय क्रंमाक आलेल्या ग्राम पंचायती वगळून जिल्हा , विभाग व राज्य स्तरावर संबंधीत ग्राम पंचायतीना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
विशेष पुरस्कार
स्वर्गीय वसंतराव नाईक घनकचरा व सांडपाणी व मैलागाळ व्यवस्थापन जिल्हास्तर रु ५० हजार , विभागस्तर ७५ हजार व राज्यस्तर रु 3 लाखाचे पुरस्कार देण्यात येणार . डॉ. बाबा साहेब आंबडेकर पुरस्कार पाणी गुणवत्ता व पाणी व्यवस्थापनजिल्हास्तर रु ५० हजार , विभागस्तर ७५ हजार व राज्यस्तर रु 3 लाखाचे पुरस्कार देण्यात येणार आहे, या शिवाय स्व. आबासाहेब खेडकर पुरस्कार शौचालय व्यवस्थापनासाठी देण्यात येणार आहे.
याशिवाय वेग वेगळ्या महत्वाच्या बाबीसंदर्भातील कामगीरी करीता ग्राम पंचायत, ग्राम पंचायत कर्मचारी ग्रामसेवक यांना देखील विशेष पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.