ग्रामविकास मंत्री गिरीश महाजनांचा प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदल्यांना हिरवा कंदील.
मुंबई,प्रतिनिधी:-गेले तीन वर्ष कोरोनामुळे प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदल्या रखडल्या होत्या.यासाठी स्वराज्य शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य "बदली हवी टीमच्या" माध्यमातून सतत पाठपुरावा करत होती.दि.१९ ऑक्टोबर रोजी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष गजानन पांचाळ सर व समन्वयक अशोक कुटे सर यांच्या नियोजनाखाली बदली हवी टीमने ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्याकडे पाठपुरावा केला.अखेर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी संध्याकाळी जिल्हाअंतर्गत बदल्यांच्या महत्त्वपूर्ण फाईलवर सही करून मंजुरी दिली अशी माहिती अशोक कुटे यांनी दिली.यावेळी ग्रामविकास विभागाचे उपसचिव वळवी यांना समक्ष बोलावून सविस्तर चर्चा करुन २ दिवसांत बदली पोर्टल चालू करण्याच्या सूचना दिल्या.गजानन पांचाळ सर,अशोक कुटे सर,पवार सर व इतरांनी एकत्र येऊन बदली हवी टीम व्हाट्सअप ग्रुप तयार केला होता. सलग पंधरा दिवस ऑनलाईन मीटिंग,विविध अधिकारी पदाधिकाऱ्यांच्या यांच्या यासंदर्भात भेटी घेतल्या होत्या. तसेच आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्याचे देखील नियोजन केले होते.दि.१९ ऑक्टोबर रोजी सकाळी मंत्री महाजन यांची मुंबईतील निवासस्थानी भेट घेण्यात आली.
त्यानंतर संपूर्ण दिवसभर संघटनेचे पदाधिकारी त्यांच्या केबिनमध्ये ठाण मांडून बसली होती.महिलांचे सर्व प्रश्न ऐकून महत्त्वपूर्ण फाईलवर मंत्री गिरीश महाजन यांनी अंतिम सही करून मंजुरी दिली. या संघर्षासाठी आलेल्या सर्व महिला व शिक्षक बांधवांचे संपूर्ण राज्यभरातून आभार मानले जात आहे. आता सर्वांना आनंदात दिवाळी साजरी करा असे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना म्हटले.