जिल्हास्तरीय बेंचप्रेस स्पर्धेमध्ये नेक्स्ट लेवल फिटनेसच्या खेळाडूंचे यश.

Ahmednagar Breaking News
0

जिल्हास्तरीय बेंचप्रेस स्पर्धेमध्ये नेक्स्ट लेवल फिटनेसच्या खेळाडूंचे यश.

नगर,प्रतिनिधी - नुकत्याच अहमदनगर जिल्हास्तरीय बेंचप्रेस अजिंक्यपद स्पर्धा राज्य पॉवर लिफ्टींग असोसिएशनचे सेक्रेटरी डेव्हीड मकासरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडल्या. 

या स्पर्धेत पाईपलाईन रोडवरील एकवीरा चौकाजवळील नेक्स्ट लेव्हल फिटनेसच्या खेळाडूंनी सहभाग घेऊन आपआपल्या वजनी गटात प्रथम क्रमांक पटकाविला. यामध्ये अनिकेत चिलवर, वरद सुरम, फरदीन शेख, अदनान शेख, पुष्पराज गाडे, प्रशांत पारधे, शुभम गाडे, सुरेश बनसोडे, युवराज पटारे यांचा समावेश आहे.

यशस्वी खेळाडूंची इंदापूर-पुणे येथे होणार्‍या राज्यस्तरीय बेंचप्रेस अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड झाली आहे. खेळाडूंना नेक्स्ट लेव्हल फिटनेसचे संचालक ओंकार गुर्रम व विजय कनोजिया यांचे मार्गदर्शन लाभले.

महाराष्ट्र राज्य पॉवर लिफ्टींग असोसिएशनचे सेक्रेटरी डेव्हीड मकासरे, अहमदनगर पॉवर लिफ्टींगचे कार्याध्यक्ष किशोर वारे, सुमित बटूळे, श्रीकांत फंड, मनोज गायकवाड आदिंनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top