नगर शहरात क्रिकेट मॅचवर सट्टा घेणारा व लावणाऱ्यावर कोतवाली पोलिसांचा छापा दोघांवर गुन्हे दाखल.
नगर प्रतिनिधी (२४ ऑक्टोबर):-दि.२३/१०/२०२२ रोजी दुपारी ५.०० वा सुमारास सहा.पोलीस निरिक्षक रविंद्र पिंगळे कोतवाली पोलीस स्टेशन यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली कि,अहमदनगर शहरातील पटवर्धन चौकातील मनोहर वाईन्स समोरील गाळ्या जवळ एक इसम त्याचे कडील मोबाईल वर भारत पाकिस्तान T २० क्रिकेट मँच वर सट्टा लावणारा व खेळविनारा बसलेला आहे,अशी माहीती मिळाल्याने ५.४५ वा च्या सुमारास कोतवाली पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकासह बातमीतील ठिकाणी जावुन त्याचे वर छापा टाकला असता, इसम नामे अमित सुभाषलाल गांधी (वय ४२ वर्ष रा कोर्ट गल्ली अहमदनगर) हा तेथे मिळुन आला व त्याचे कडे T २० मॅच वर सट्टा लावणे करिता वापरत असलेले दोन मोबाईल फोन मिळुन आले,तसेच त्याने त्याव्दारे काही लोकांना सट्टा खेळणे करीता लागणारे पासवर्ड व युजर आयडी पुरवल्याचे दिसुन आले.तसेच त्यास आयडी व पासवर्ड पुरविणारा परेश मुनोत हा असल्याचे निष्पन्न झाले असुन तो फरार झाला आहे.दोन्ही आरोपी हे सट्टा खेळताना व खेळविताना मिळुन आले म्हणुन पोकॉ/अमोल दिलीप गाढे यांच्या फिर्यादी वरुन कोतवाली पोलीस स्टेशन येथे गु.र.नं I ८३९/२०२२ महाजुगार कायदा कलमांतर्गत गुन्हा रजि. दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोना योगेश खामकर हे करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक श्री.राकेश ओला,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.अनिल कातकाडे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि/रविंद्र पिंगळे,पोहेकॉ/गणेश धोत्रे,पोना/योगेश भिंगारदिवे,पोना/रियाज इनामदार,पोना/योगेश खामकर,पोकॉ/अमोल गाढे,पोकॉ/सुजय हिवाळे,पोकॉ/ संदिप थोरात, पोकॉ/सोमनाथ राउत यांनी केली आहे.