ग्रामपंचायत कार्यालयातील नेतेमंडळीची अनधिकृत फोटो त्वरित काढून महापुरुषांचे फोटो लावावेत - अविनाश पवार.
पारनेर प्रतिनिधी (9. ऑक्टो):-पारनेर तालुक्यातील काही ग्रामपंचायत कार्यालयातील महापुरुषांच्या फोटो व्यतिरिक्त विवीध राजकीय पक्षाच्या कार्यकर्ते सह नेते मंडळीची अनाधिकृत फोटो कशाच्या आधारे लावलेली आहेत.याचा खुलासा गटविकास अधिकारी यांनी करुन पारनेर तालुक्यातील ज्या ग्रामपंचायत मध्ये अशा प्रकारे फोटो लावलेले आहेत अशा ग्रामपंचायतच्या ग्रामविकास अधिकारी यांच्यावर सरकारी कार्यालयाचे अनाधिकृत फोटो लाऊन विद्रूपीकरण केल्यामुळे कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी मनसेचे माथाडी कामगार सेनेचे जिल्हाअध्यक्ष अविनाश पवार यांनी निवेदनाद्वारे गटविकास अधिकारी पंचायत समिती पारनेर यांना केली आहे जर आठ दिवसांत हे सर्व अनाधिकृत नेते मंडळीची फोटो शासकीय कार्यालयातून काढली नाही तर मनसे स्टाईल खळखट्याक आंदोलन करण्याचा इशारा मनसे माथाडी कामगार सेना जिल्हाअध्यक्ष अविनाश पवार व नितीन म्हस्के सहकार सेना जिल्हाअध्यक्ष यानी गट विकास अधिकारी यांना दिला आहे.