दरोड्याच्या गुन्ह्यातील सराईत आरोपी जेरबंद श्रीगोंदा पोलिसांची जबरदस्त कारवाई.

Ahmednagar Breaking News
0

 दरोड्याच्या गुन्ह्यातील सराईत आरोपी जेरबंद श्रीगोंदा पोलिसांची जबरदस्त कारवाई.

अहमदनगर.प्रतिनिधी (१४ ऑक्टो):-कर्जत पोलीस स्टेशनला दाखल असलेला दरोडा व खुनाचे गुन्ह्यातील पाहीजे असलेले आरोपी थेरगाव फाटा ता.कर्जत येथे वस्तीवर येणार असले बाबतची माहीती श्रीगोंदा पोलीस स्टेशन निरीक्षक रामराव ढिकले यांना मिळाली होती.सदर माहीतीवरुन गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व पोलीस कर्मचारी यांना थेरगाव फाटा ता.कर्जत येथिल गुन्हेगार वस्तीवर कॉबिग ऑपरेशन करण्यास सांगितले होते पथकाने सदर ठिकाणी दि.१३ ऑक्टो रोजी २.०० ते ८.०० वा.पर्यंत कॉबिंग ऑपरेशन राबविले असता तिन संशयित ईसम मिळुन आले त्यांना ताब्यात घेवुन त्यांची नावे विचारली असता त्यांनी त्यांची नावे १)निमिशा कुंडलिक भोसले वय ४५ वर्षे,रा.थेरगाव फाटा ता.कर्जत २)नितिन उर्फ निशान भगवान उर्फ भानुदास भोसले वय ३५ वर्ष रा.तेंडुळी,बिडकीन,औरंगाबाद असे सांगितले. त्यांचेकडे कसुन चौकशी केली असता त्यांचे विरुध्द कर्जत पोलीस स्टेशनला खालील प्रमाणे गुन्हे दाखल असुन ते गुन्हा घडल्यापासुन फरार होते.१)कर्जत पोलीस स्टेशन गु.रजि.नं.७६/२०२२ भादविक ३९५ या गुन्ह्यातील फरार आरोपी निमिशा कुंडलिक भोसले वय ४५ वर्षे,रा.थेरगाव फाटा ता.कर्जत,नितिन उर्फ निशान भगवान उर्फ भानुदास भोसले वय ३५ वर्षे रा.तेंडुळी, बिडकीन,औरंगाबाद,असे गंभीर गुन्हे या आरोपींवर दाखल होते.पुढील कारवाई कर्जत पोलीस स्टेशन करीत आहे.सदरची कारवाई पोलीस अधिक्षक मा.मनोज पाटील,अप्पर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक/रामराव ढिकले,पोसई/समीर अभंग,सफौ/अंकुश ढवळे,पोना/गोकुळ इंगवले,पोकॉ/ प्रकाश मांडगे,पोकॉ/किरण बोराडे,पोकॉ/दादासाहेब टाके,पोकॉ/अमोल कोतकर,पोकॉ/रविंद्र जाधव यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top