अहमदनगर जिल्ह्यातील प्रलंबित असलेला अंमली पदार्थ (गांजा/अफु/गर्द) नाश - अहमदनगर जिल्हा पोलीस दलाची कारवाई.
अहमदनगर प्रतिनिधी (१७ ऑक्टो):-अहमदनगर जिल्ह्यातील प्रलंबित असलेला एकुण ३८४३ किलो २३८ ग्रॅम १२० मिली ग्रॅम अंमली पदार्थ(गांजा/अफु/गर्द) अहमदनगर जिल्हा पोलीस दलाने १७ ऑक्टोबर रोजी नाश केला आहे.प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की,अंमली पदार्थ विरोधी कायदा सन १९८५ अन्वये अहमदनगर जिल्ह्यात विविध पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्यात ५० एकुण ३८४३ किलो २३८ ग्रॅम १२० मिली ग्रॅम गांजा,अफु,गर्द जप्त करण्यात आला होता. नमुद गुन्ह्यांचा मुदतीत तपास पुर्ण करुन मा. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.
मा.न्यायालयात न्यायालयीन प्रक्रियापुर्ण करुन मा. न्यायालयाने मुद्देमाल नाश करणे बाबत आदेश दिले होते. मा.पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडील आदेशान्वये श्री.मनोज पाटील पोलीस अधिक्षक यांचे अध्यक्षतेखाली श्री.सौरभ कुमार अग्रवाल (सदस्य) तथा अपर पोलीस अधिक्षक अहमदनगर,श्री.मेघश्याम डांगे (सदस्य) तथा पोलीस उपअधिक्षक (गृह) अहमदनगर, श्री.अनिल कटके (सदस्य)पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर, सहा.पोनिरी.गणेश इंगळे,पो.उपनिरीक्षक सोपान गोरे व स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार सहा.पोउपनिरी- व्ही.जे.घोडेचोर,हेकॉ.डी.डी.शेलार,पो.हे.कॉ.एफ.ए.शेख,पो.हेकॉ. गव्हाणे,पोहेकॉ.एस.एम.बुधवंत,पो.ना.एस.एस.चौधरी, पो.ना.विशाल दळवी,पो.ना.आर.बी.सोळुंके,पो.ना.एस. एस.दरंदले, पो.ना.रणजित जाधव,पो.कॉ.एस.ए. ढाकणे, पो.कॉ.नवगिरे,पो.कॉ.आर.ए. येमुल,पो.कॉ.जे.ए माने, पो.कॉ.एम.डी.गायकवाड,पोकॉ.जे.बी जंगले, चालक पो.हे.कॉ. बेरड,चा.पो.हे.कॉ.यु.एम.गावडे,चा.पो.हे.कॉ.एस.डी.कोतकर,चा.पो.ना.बी.एम.बुधवंत अशांनी अहमदनगर जिल्हयातील सन २००३ ते २०२१ पावेतो ५० गुन्ह्यातील एकुण ३८४३ किलो २३८ ग्रॅम १२० मिली ग्रॅम गांजा/अफु / गर्द असा नाश करणेसाठी प्रलंबित असलेला अंमली पदार्थ (गांजा/अफु/गर्द नाश करण्याची योग्य ती कायदेशिर प्रक्रिया पुर्ण करुन सोमवार दिनांक १७/१०/२०२२ रोजी राजंणगांव एमआयडीसी,जिल्हा पुणे येथील कंपनीत नाश केला.यापुर्वी दिनांक २६/०२/२०२२, दिनांक २७/४/२०२२ व दिनांक २७/०६/२०२२ रोजी रोजी अहमदनगर जिल्ह्यातील अंमली पदार्थ सदरातील दाखल ९० गुन्ह्यातील एकुण २४०१ किलो १३४ ग्रॅम ५८० मिली ग्रॅम अंमली पदार्थ (गांजा/अफु / गर्द) नाश करण्यात आला होता. तसेच दिनांक १७/१०/२०२२ रोजी ५० गुन्ह्यातील एकुण ३८४३ किलो २३८ ग्रॅम १२० मिली ग्रॅम अंमली पदार्थ असा अहमदनगर जिल्ह्यातील दिनांक ०१ जानेवारी २०२२ ते आज पर्यंत एकुण १४० गुन्ह्यातील एकुण ६२४४ किलो ३७२ ग्रॅम ७०० मिली ग्रॅम अंमली पदार्थ सदरा खालीलदाखल गुन्ह्यातील मुद्देमाल नाश करण्यात आलेला आहे.सदरची कारवाई मा.श्री.मनोज पाटील पोलीस अधिक्षक अहमदनगर,श्री.सौरभ कुमार अग्रवाल,अपर पोलीस अधिक्षक,अहमदनगर,श्री.मेघश्याम डांगे, पोलीस उपअधिक्षक (गृह) अहमदनगर,श्री.अनिल कटके,पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांचे सह स्थानिक गुन्हे शाखेतील अंमलदार यांनी पुर्ण केलेली आहे.