घरावर दरोडा घालणारे दोन सराईत आरोपी जेरबंद - स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.

Ahmednagar Breaking News
0

 

घरावर दरोडा घालणारे दोन सराईत आरोपी जेरबंद - स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.


अहमदनगर प्रतिनिधी : धोत्रे ता. पारनेर येथील घरावर दरोडा घालणारे दोन सराईत आरोपी जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.फिर्यादी श्री. सावळेराव देवराम भांड, वय 24, रा. जामगांव रोड, धोत्रे बु, ता. पारनेर हे त्यांचे पत्नीसह घरामध्ये झोपलेले असतांना अंदाजे 25-30 वयाचे 5-6 अनोळखी इसमांनी घराचा दरवाजा कशानेतरी उघडुन आत प्रवेश करुन फिर्यादी व त्यांची पत्नी यांना कोयता व चाकुचा धाक दाखवुन मारहाण करुन घरातील सोन्याचे दागिने चोरी केले तसेच फिर्यादी यांचे शेजारी राहणारे श्री. विठ्ठल बबन भांडे यांना कोयता व चाकुचा धाक दाखवुन मारहाण व जखमी करुन  एकुण 1,40,600/- रु. किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने घेवुन पळुन गेले. सदर घटने बाबत पारनेर पोलीस स्टेशन गु.र.नं. 838/2022 भादविक 395, 397, 342, 427 प्रमाणे दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

                  सदर घटना घडल्यानंतर मा. श्री. मनोज पाटील साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांनी गुन्हयांचे गांर्भीर्य लक्षात घेऊन पोनि/श्री. अनिल कटके यांना स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे विशेष पथक नेमून गुन्ह्याचा सखोल व बारकाईने समांतर तपास करुन गुन्हयातील आरोपींचा शोध घेऊन कारवाई करणेबाबत आदेश दिले होते. 

                नमुद आदेशान्वये पोनि/श्री. अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि/दिनकर मुंडे, सफौ/भाऊसाहेब काळे,पोहेकॉ/सुनिल चव्हाण, दत्तात्रय हिंगडे, संदीप पवार, देवेंद्र शेलार, पोना/शंकर चौधरी, दिपक शिंदे, पोकॉ/सागर ससाणे, मच्छिंद्र बर्डे, रोहित येमुल, विजय धनेधर व चापोहेकॉ/बबन बेरड अशांनी मिळुन पारनेर परिसरात संशयीत आरोपींची माहिती व शोध घेत असतांना पोनि/श्री. अनिल कटके यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा हा रांजणगांव मशिद, ता. पारनेर येथील आरोपी नामे प्रदीप काळे व त्याचे साथीदारांनी मिळुन केला असुन आत गेल्यास त्याचे घरी मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/श्री. कटके यांनी सदर बातमी पथकास कळवुन, खात्री करुन कारवाई करणे बाबत सुचना दिल्या. नमुद सुचना प्रमाणे पथकाने आरोपी नामे प्रदीप काळे यांचे रांजणगांव मशिद, ता. पारनर येथील राहते घरा जवळ जावुन सापळा लावण्याचे तयारीत असतांना संशयीतास पोलीस पथकाची चाहुल लागताच ते मोटार सायकलवर बसुन पळुन जावु लागले पथकाने त्यांचा पाठलाग करुन दोन इसमांना शिताफीने ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या दोन्ही इसमांना त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे 1) प्रदीप ऊर्फ खुटल्या आरकस काळे, वय 20 व 2) निमकर अर्जुन काळे, वय 21, दोन्ही रा. रांजणगांव मशिद, ता. पारनेर असे असल्याचे सांगितले. त्यांचेकडे वरील गुन्हयाबाबत चौकशी केली असता सुरुवातीस त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांना अधिक विश्वासात घेेऊन सखोल चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा त्यांचे इतर साथीदारांसह केल्याची कबुली दिलेली आहे.  

              ताब्यातील आरोपींकडे अधिक सखोल व बारकाईने चौकशी करता त्यांनी धोत्रे बु, ता. पारनेर या व्यतिरिक्त कान्हुर पठार व कन्हेर ओहळ, ता. पारनेर येथे घरात घुसून चोरीचे दोन गुन्हे केल्याची कबुली दिलेली आहे. सदर कबुली वरुन अहमदनगर जिल्हा गुन्हे अभिलेख पडताळणी करता पारनेर पोलीस स्टेशन येथे कान्हुर पठार येथील गुन्ह्यात जबरी चोरी व कन्हेर ओहळ येथील गुन्ह्यात घरफोडीचे गुन्हे दाखल असले बाबत माहिती प्राप्त झाली ती खालील प्रमाणे -

अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम

1. पारनेर 469/2022 भादविक 394

2. पारनेर 760/2022 भादविक 457, 458, 459, 380, 34


आरोपी नामे प्रदीप ऊर्फ खुटल्या आरकस काळे हा सराईत गुन्हेगार असुन त्याचे विरुध्द अहमदनगर व पुणे जिल्ह्यात दरोडा, दरोडा तयारी, जबरी चोरी, चोरी असे गंभीर स्वरुपाचे एकुण 08 गुन्हे दाखल आहेत. ते खालील प्रमाणे

अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम

1. श्रीगोंदा 708/17 भादविक 399, 402

2. श्रीगोंदा 439/18 भादविक 397, 459

3. श्रीगोंदा 671/18 भादविक 395, 504, 506

4. पारनेर 448/20 भादविक 341, 324, 337, 427

5. राजंणगांव एमआयडीसी, पुणे 379/20 भादविक 394, 412

6. बेलवंडी 138/20 भादविक 394, 397, 34

7. सुपा 137/22 भादविक 379

8. सुपा 248/22 भादविक 379


आरोपी नामे निमकर अर्जुन काळे हा सराईत गुन्हेगार असुन त्याचे विरुध्द अहमदनगर जिल्ह्यात दरोडा, दरोडा तयारी, जबरी चोरी, घरफोडी व चोरी असे गंभीर स्वरुपाचे एकुण 11 गुन्हे दाखल आहेत. ते खालील प्रमाणे

अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम

1. श्रीगोंदा 98/16 भादविक 399, 402

2. बेलवंडी 172/21 भादविक 379, 34

3. बेलवंडी 113/17 भादविक 399, 402

4. श्रीगोंदा 875/21 भादविक 379

5. श्रीगोंदा 243/21 भादविक 379

6. नगर तालुका 229/18 भादविक 394, 34

7. बेलवंडी 93/17 भादविक 394, 32, 452, 34

8. श्रीगोंदा 1831/20 भादविक 395

9. बेलवंडी 447/21 भादविक 379, 380

10. श्रीगोंदा 878/21 भादविक 457, 380

11. बेलवंडी 137/21 भादविक 394, 34

ताब्यात घेतलेल्या दोन्ही आरोपींना पारनेर पोलीस स्टेशन येथे हजर केले असुन पुढील कारवाई पारनेर पोलीस स्टेशन करीत आहे.

सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटील साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्री. सौरभ कूमार अग्रवाल साहेब, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर व श्री. अजित पाटील साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर ग्रामिण विभाग, अहमदनगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे. 



Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top