डॉ.विखे पाटील अभियांत्रिकीत कॅम्पस मुलाखतीमध्ये नोकरीसाठी आठ विद्यार्थ्यांची निवड.

Ahmednagar Breaking News
0

 डॉ.विखे पाटील अभियांत्रिकीत कॅम्पस मुलाखतीमध्ये नोकरीसाठी आठ विद्यार्थ्यांची निवड.

नगर, प्रतिनिधी - विळद घाट येथील डॉ.विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अँण्ड टेलिकम्युनिकेशन विभागात विविध  कंपन्या मार्फत शेवटच्या वर्षातील  अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यामध्ये आठ ही विद्यार्थ्याची नोकरीसाठी निवड केली.यामधे शीतल दुसाने (7लाख रू. मेग्ना इलेक्ट्रॉनिक)तर पूजा नरसाळे, प्रियंका पानमंद, रुचिता मुंढे, पूजा पवार या चार विद्यार्थिनीची  पाच लाख प्रतिवर्ष पगारावर निवड करण्यात आली. या चारही विद्यार्थिनींना हेला ऑटोमोटिव्ह कंपनी ने सिलेक्ट केले आहे. तर प्रतिक्षा दुमटे (4लाख रू.स्केअर यार्ड कंपनी) अक्षता ढोले (4लाख रू. केपजेमिनी कंपनी ) सारिका परदेशी (3.50लाख रू.हेक्वावेअर कंपनी ) यांची निवड झाली.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल विद्यार्थी व पालक यांचा महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स अँण्ड टेलिकम्युनिकेशन विभागाने महाविद्यालयात विखे फाऊंडेशनचे डेप्युटी डायरेक्टर (टेक्नि.) प्रा.सुनिल कल्हापुरे व विखे अभियांत्रिकीचे  प्राचार्य डॉ. उदय नाईक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी विभागप्रमुख डॉ.अनिता पाटील आदि उपस्थित होत्या.

या मुलाखती दरम्यान विद्यार्थ्यांची प्रथम योग्यता चाचणी घेण्यात आली. त्यानंतर तांत्रिक चाचणी आणि प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे निवड करण्यात आली. या मुलाखतीच्या यशस्वीतेसाठी ट्रेनिंग अॅरण्ड प्लेसमेंट ऑफिसर प्रा.सुदर्शन दिवटे तसेच शिक्षण समन्वयक प्रा.अमोल लांडगे व प्रा.अनिकेत विखे यांनी प्रयत्न केले.

डॉ.विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय हे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्याकडे लक्ष देतेय, त्याचबरोबर विद्यार्थ्यांमधील व्यक्तीमत्व विकास, तांत्रिक कौशल्य विकास व संभाषण कौशल्य तसेच विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढविण्यासाठी सतत प्रयत्नशील असते, असे प्रा.सुनिल कल्हापुरे यांनी सांगितले.

या यशाबद्दल चेअरमन ना.राधाकृष्ण विखे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी खा.डॉ.सुजय विखे पा., संस्थेचे प्रभारी सेक्रेटरी (टेक्नि.) डॉ. पी.एम.गायकवाड यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top