फार्मासिस्ट हा समाजाचा प्राथमिक आरोग्य मित्र-दत्ता गाडळकर

Ahmednagar Breaking News
0

फार्मासिस्ट हा समाजाचा प्राथमिक आरोग्य मित्र-दत्ता गाडळकर.


 अहमदनगर प्रतिनिधी.- आज प्रत्येकाला थोडं जरी बरं वाटत नसले तरी तो मेडिकलमध्ये जाऊन गोळ्या-औषधे घेत असतो. आपला प्राथमिक आजार बरा करण्यासाठी मेडिकल (फार्मासिस्टची) मोठी मदत होत असते. त्यामुळे अनेक आजार हे प्राथमिक स्तरावरच बरे होतात. त्यामुळे फार्मासिस्ट हा समाजातील महत्वचा घटक आहे. एक प्रकारे प्राथमिक आरोग्य मित्र असेच म्हणावे लागेल. त्यामुळे फार्मसिस्ट विद्यार्थ्यांनी अभ्यासबरोबरच मनुष्याच्या शारीरिक व स्वभाव गुणांचाही अभ्यास करता आला पाहिजे.  त्यातून आपली प्रगल्भता वाढवली पाहिजे. पाउलबुधे फार्मसी महाविद्यालय विद्यार्थ्यांसाठी राबवित असलेले उपक्रम कौतुकास्पद असेच आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास होत असल्याचे प्रतिपादन केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता गाडळकर यांनी केले. 
वसंत टेकडी येथील पाउलबुधे फार्मसी महाविद्यालयात जागतिक फार्मासिस्ट दिन सप्ताहभर विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. याप्रसंगी केमिस्ट अससोसिएशनचे अध्यक्ष दत्ता गाडळकर, उपाध्यक्ष भारत सुपेकर, मनीष सोमाणी, मनोज खेडकर, महेश आठरे, मनीषा आठरे, अभिजित गांगर्डे, अतुल आंधळे, संस्थेचे साई पाऊलबुद्धे, रामकिसन देशमुख, रामभाऊ बुचकुल, दादासाहेब भोईटे, संदीप कांबळे, सविता सानप,  डॉ. निलेश जाधव आदी उपस्थित होते 
यावेळी महाविद्यालयात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे  व आरोग्य जजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तसेच  रोल ऑफ फार्मासिस्ट इन हेल्थकेअर सिस्टिम या विषयावर ऑनलाइन पोस्टर सादरीकरण स्पर्धा, लोगो आणि स्लोगन स्पर्धा, विद्यार्थ्यांची परिसरातून रॅली काढण्यात आली.  यात फलकाद्वारे औषधनिर्माणाचे आरोग्य सेवेतील मह्त्त्व व  कार्य तसेच करियरच्या संधी याबद्दल संदेश दिला. सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी गुणवंत विद्यार्थ्यांनाचा  गौरव करण्यात आला.
यावेळी बी. एड. महाविद्यालयाच्या प्राचार्या रेखराणी खुराणा, बी.फार्मसी  कॉलेजचे प्राचार्य डॉ. निलेश जाधव, डी. फार्मसीच्या प्राचार्य अनुराधा चव्हाण, विभाग प्रमुख सुरेखा बारवाल, अबिद पठाण, सांस्कृतिक विभागाचे प्रमुख सुधीर गर्जे, रुपाली माताडे आदी कर्मचारी वृंदाना कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.  शेवटी प्रणाली अनमल यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top