आशा टॉकीज चौक येथे तलवारी, गुप्त्या तसेच धारदार शस्त्रांची खुल्या प्रकारे विक्री.
कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिंदेची कारवाई ; 1 आरोपी अटक 21 हत्यारे जप्त.
नगर,प्रतिनिधी - कोतवाली पोलीस ठाण्याच्या लगतच तलवारी विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्या दुकानदारावर कोतवाली पोलिसांनी आज दि.18 ऑक्टोंबर रोजी कारवाई केली. शहरात आशा टॉकीज चौकात एका दुकानात तलवारी विकत असल्याची माहिती कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांना मिळली होती.त्या नुसार संबंधित दुकानावर जाऊन छापा टाकला असता या ठिकाणी तलवारी,गुप्ती तसेच चाकू आढळून आले आहेत. तसेच या ठिकाणी हुक्का पार्लरसाठी लागणारे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहेत.याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात संबंधित इसमाविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.