गजानन महाराज मंदिर, नवलेनगर, गुलमोहर रोड, येथील मंदिरात नवरात्री निमित्त देवी समोर होम हवन.
सालाबादप्रमाणे यावर्षी गजानन महाराज मंदिर, नवले नगर, गुलमोहर रोड येथे नवरात्री उत्सव करण्यात आला.दररोज सकाळी आणि संध्याकाळी परिसरातील नागरिक तसेच परिसरातील प्रतिष्टीत लोकांच्या हस्ते आरती करण्यात आली.
आज अष्टमी निमित्त देवी समोर होम-हवन करण्यात आले.परिसरातील श्री -सौ.निखिल जगदाळे, श्री -सौ. संतोष काकडे, श्री -सौ. प्रसाद जोगदंड, श्री -सौ. अशोक पालवे यांच्या हस्ते होम -हवन करण्यात आले. त्यावेळी परिसरातील महिलाआणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच आज परिसरातील महिलासाठी रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. त्यास भरपूर महिलांनी प्रतिसाद दिला.त्यात सौ. स्नेहा प्रसाद जोगदंड यांचा प्रथम क्रमांक आला, दुसरा क्रमांक सौ. रासने, तृतीय क्रमांक सौ. अंजली वाघ, तसेच उत्तेजनार्थ सौ. सुनंदा म्हस्केआणि श्रुती नवले यांना मिळाले.