नगरकरांच्या स्वप्नातील उड्डाणपूल अखेर प्रत्यक्षात उतरणार. खा.डॉ.सुजय विखे पाटील व आ.संग्राम जगताप यांनी केली आज उड्डाणपुलाची पाहणी.
नगर, प्रतिनिधी.(31.ऑक्टोबर ) :19 नोव्हेंबर रोजी नगरकरांच्या स्वप्नातील उड्डाणपूल अखेर प्रत्यक्षात उतरणार आहे.या उड्डाणपुलाचा शुभारंभ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. आज शहराचे आमदार संग्राम जगताप व खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी पूर्ण झालेल्या उड्डाण पुलाच्या कामाची पाहणी केली व उड्डाण पुलावरून फेरफटका मारला. 20 नोव्हेंबर पासून नगरकरांना वाहतुकीसाठी हा उड्डाणपूल खुला होणार आहे,अशी माहिती यावेळी खासदार सुजय विखे पाटील यांनी दिली.
सुजय विखे म्हणाले की उड्डाण पुलाच्या माध्यमातून नगरकरांची स्वप्न पूर्ण झाले आहे.मी व आमदार संग्राम जगताप आम्ही दोघांनीही जो संकल्प केला होता तो पूर्ण झाला आहे. या माध्यमातून नगर जिल्ह्याच्या सौंदर्यकारणात भर पडली आहे.या कामासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे मोलाचे योगदान लाभले आहे.