अहमदनगर शहरासह मध्यवर्ती भागात पाणीपुरवठा विस्कळीत

Ahmednagar Breaking News
0

अहमदनगर शहरासह मध्यवर्ती भागात पाणीपुरवठा विस्कळीत.


 नगर प्रतिनिधी:- मंगळवार दि.११/१०/२०२२ सांयकाळी
५.५० वाजलेच्या सुमारास अहमदनगर शहरास पाणी पुरवठा करणारी नविन मुख्य ८१३ एम.एम.एम.एस. जलवाहिनी विळद गावा जवळील हॉटेल प्रियंका समोरील ठिकाणी महामार्गा लगत गॅस पाईपलाईन टाकणेचे चालू असलेल्या कामामुळे सदर ठेकेदाराचे पोकलॅन मशिनचा मुख्य जलवाहिनीच्या एअर व्हॉलला धक्का लागून जलवाहिनी फुटलेली आहे.
सदर जलवाहिनी दुरुस्तीचे काम महानगरपालिकेने तातडीने हाती घेतलेले आहे. परंतू दुरूस्ती कामास अवधी लागणार आहे.
त्यामुळे सदर जलवाहिनीद्वारे होणारा पाणी उपसा बंद असल्याने शहर वितरण व्यवस्थेच्या पाण्याच्या टाक्या भरणे शक्य होणार नाही.त्यामुळे बुधवार दि.१२/१०/२०२२ रोजी रोटेशन नुसार पाणी वाटपाच्या शहराच्या मध्यवर्ती भागास म्हणजेच मंगलगेट,रामचंद्रखुंट, झेंडीगेट,जिल्हाधिकारी कार्यालय परिसर,
दाळमंडई,काळू बागवान गल्ली,धरती चौक, माळीवाडा,कोठी इत्यादी सह गुलमोहर रोड,प्रोफेसर कॉलनी परिसर, सिव्हील हाडको,प्रेमदान हाडको,म्युनिसीपल हाडको, विनायकनगर,
आगरकर मळा,इत्यादी भागास उशिराने व कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.तरी पाण्याचा वापर काटकसरीने करून
महानगरपालिकेस सहकार्य करावे. असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.







Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top