स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.- डिझेल चोरी करणारी टोळी मुद्देमालासह जेरबंद.

Ahmednagar Breaking News
0

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.- डिझेल चोरी करणारी टोळी मुद्देमालासह जेरबंद.

अहमदनगर प्रतिनिधी (३० ऑक्टोबर):-रोडवरील उभ्या केलेल्या वाहनातून डिझेल चोरी करणारी टोळी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.

                प्रस्तृत बातमीतील हकीगत अशी की,यातील फिर्यादी नवाज फकिर महंमद शेख वय ३५ रा.हसनापुर, ता.राहाता यांची लोणी येथील भारत पेट्रोलपंपा- समोर दोस्ती गॅरेज समोर दुरुस्तीकरीता ट्रक क्रमांक एम.एच.१४.ईएम.९५४७ ही उभी करुन ठेवली असता पांढरे रंगाचे स्विप्ट डिझायर कारमधुन आलेल्या अज्ञात ०३ चोरटयांनी त्यांचे ट्रकचे टाकीचे लॉक तोडून ट्रकमधील १५० लि.डिझेल चोरी केले तसेच इतर बाजुला उभ्या असलेल्या साक्षीदारांच्या वाहनांतून ४०० लि.डिझेल चोरुन नेलेबाबत दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा रजि.दाखल करण्यात आला होता.याबाबत लोणी पो.स्टे.गुरनं ५०४/२०२२ भादविक ३७९,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर गुन्हयाचे तपासाबाबत मा.श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांनी अहमदनगर जिल्हयामध्ये रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांमधुन डिझेल चोरीचे प्रकार वाढत असल्याने गुन्हयांचे गांभीर्य लक्षात घेऊन श्री. अनिल कटके,पोलीस निरीक्षक,स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे विशेष पथक नेमून सचिन गुन्ह्याचा सखोल व बारकाईने समांतर तपास करुन गुन्हयातील आरोपींचा शोध घेऊन कारवाई करणेबाबत आदेश दिले होते.

            नमुद आदेशान्वये मा.श्री.अनिल कटके पोलीस निरीक्षक,स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की,इसम नामे १)रितेश वसंत सदाफळ रा.गणेशनगर,ता.राहाता (२) अमोल अविनाश कुंदे रा.एकरुखा ता.राहाता (३)अजय राजू भोसले रा.गणेशनगर ता.राहाता हे एका पांढरे रंगाचे स्विफ्ट कारने चोरी केलेले डिझेलची विक्री करण्यासाठी अहमदनगरकडे येत आहेत.अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने त्यांनी सदर माहिती सपोनि श्री.दिनकर मुंडे यांना सांगून स्टाफसह जाऊन खात्री करून कारवाई करणेबाबतचे आदेश दिले. मोकळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने निर्मळपिंप्री येथील बंद पडलेल्या टोलनाक्याजवळ सापळा लावला असता शिर्डी रोडने नमुद वर्णनाची पांढरी रंगाची स्विफ्ट कार येताना दिसली,पथकाची खात्री झाल्याने सदर कारला थांबण्याचा इशारा करताच कार थांबली.त्यामधील इसमांना ताब्यात घेऊन त्यांची नावे विचारली असता त्यांनी त्यांची नांवे १)रितेश वसंत सदाफळ रा.गणेशनगर,ता.राहाता २)ऋतुंजय उर्फ अमोल अविनाश कुंदे रा.एकरुखा ता.राहाता ३)अजय राजू भोसले रा.गणेशनगर ता.राहाता अशी असल्याची सांगितली. त्यांचेकडे चौकशी केली असता त्यांचे कारमध्ये व रामपूरवाडी शिवारातील हॉटेल साई पवन येथे ठेवलेले ५५० लि.डिझेल, डिझेल काढण्यासाठी लागणारे साहित्य व गुन्ह्ययात वापरलेली स्विफ्ट कार असा एकुण ४,९९,५००/- रु.किमतीचा मुद्येमाल जप्त करण्यात आलेला आहे.

            सदर आरोपींना पुढील कारवाईकरीता लोणी पो.स्टे.ला मुद्येमालासह हजर करण्यात आले आहे.सदरची कारवाई मा.डॉ.श्री.बी.जी. शेखर पाटील विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र,नाशिक,मा.श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा.श्रीमती स्वाती भोर,अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर,मा.श्री.संजय सातव,उपविभागीय पोलीस अधिकारी, शिर्डी विभाग,श्री.अनिल कटके स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि/दिनकर मुंडे,सफौ/मनोहर शेजवळ,पोहेकॉ/बापूसाहेब फोलाणे, संदीप पवार,पोना/शंकर चौधरी,विशाल दळवी,दिलीप शिंदे,भिमराज खर्से,पोकॉ/विनोद मासाळकर,चापोहेकॉ/ बबन बेरड,चंद्रकांत कुसळकर यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top