कंटेनर ने कट मारल्याने नगर - पुणे महामार्गावर बसचा भीषण अपघात,10-12 प्रवासी..
अहमदनगर,प्रतिनिधी.(28 नोव्हेंबर):-अहमदनगर-पुणे महामार्गावर नगर तालुक्यातील कामरगाव शिवारात कंटेनरने कट मारल्याने एसटी बस पलटी झाली आहे. या अपघातात 10 ते 12 जण जखमी झाले आहे. अहमदनगरमधून ४० प्रवासी घेऊन ही बस पुण्याच्या दिशेने निघाली होती.नगर तालुक्यातील कामरगाव शिवारात कंटेनरने या बसला कट मारला.यात बस चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस पलटी झाली. यामध्ये 10 ते 12 प्रवाशी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान अपघात झाल्यानंतर महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि वाहतूक सुरळीत केली.