स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई - नगर शहरात 300 किलो गोमांस जप्त दोघांवर गुन्हे दाखल.

Ahmednagar Breaking News
0

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई - नगर शहरात 300 किलो गोमांस जप्त दोघांवर गुन्हे दाखल.

नगर,प्रतिनिधी (१५.नोव्हेंबर) : महाराष्ट्र राज्यात बंदी असलेले गोवंशीय जातीचे 1,10,000/- (एकलाख दहा हजार) रु.किंमतीचे 300 (तिनशे) किलो गोमास व रिक्षा बाबा बंगाली चौक येथुन जप्त स्थानिक गुन्हे शाखा यांनी कारवाई केली आहे.मा.श्री. राकेश ओला पोलीस अधीक्षक,अहमदनगर यांनी पोनि/श्री.अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा यांना जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समुळ उच्चाटन करण्याचे दृष्टीने माहिती घेवुन कारवाई करणे बाबत आदेश दिले होते.नमुद आदेशान्वये पोनि/श्री.अनिल कटके,स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना बोलावुन घेवुन अहमदनगर शहरात अवैध धंद्याविरुध्द कारवाई करणे बाबत सुचना देवुन पथकास लागलीच रवाना केले.

             पथक पेट्रोलिंग करुन माहिती घेत असतांना पोनि/श्री.अनिल कटके यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की,कारी मस्जिद अहमदनगर येथील बाबा बंगाली दर्ग्याचे पाठीमागे इसम नामे सोहेब कुरेशी हा गोवंशीय जातीची जिवंत जनावरे डांबुन ठेवुन,त्यांची कत्तल करुन गोमासची विक्री करण्याचे उद्देशाने रिक्षातुन वाहतुक करत आहे आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/श्री.कटके यांनी लागलीच स्थागुशा पथकास बातमीतील नमुद ठिकाणी जावुन खात्री करुन कारवाई करणे बाबत आदेश दिले.स्थागुशा पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी लागलीच दोन पंचाना सोबत घेवुन कारी मस्जिद येथील बाबा बंगली दर्ग्याचे पाठीमागे जावुन सापळा लावुन थांबलेले असतांना बातमीतील नमुद एक तीन चाकी रिक्षा येतांना दिसली,रिक्षा चालकास हात दाखवुन थांबण्याचा इशारा करताच त्याने रिक्षा थांबवली रिक्षामध्ये बसलेल्या एक इसम व रिक्षा चालक यांना जागीच ताब्यात घेवुन त्यांना पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी 1) सोहेब गुलाब शब्बर कुरेशी,वय 28,रा.ब्यापारी मोहल्ला,कुरेशी मस्जिद जवळ,झेंडीगेट, अहमदनगर व 2) इरशाद खुदाबक्श सय्यद वय 32,रा.ब्यापारी मोहल्ला,कुरेशी मस्जिद जवळ,झेंडीगेट, अहमदनगर असे असल्याचे सांगितले.त्यांचेकडे गोवंश कत्तल व वाहतुकी बाबत विचारपुस करता त्यांनी गोवंश जातीचे जनावरांची कत्तल करुन रिक्षा मधुन गोमास विक्री करीता घेवुन चाललो असल्याची कबुली दिली.ताब्यात घेतलेल्या आरोपींचे कब्जात 300 किलो गोमास व अर्धवट कापलेली गोवंशीय जनावरे व वाहतुकीसाठी वापरलेली तीनचाकी रिक्षा असा एकुण 1,10,000/- रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.सदर बाबत पोहेकॉ/440 संदीप कचरु पवार ने.स्थागुशा अहमदनगर यांचे फिर्यादी वरुन कोतवाली पोलीस स्टेशन 903/2022 भादविक 269, 34 सह महाराष्ट्र पशुसंरक्षण (सुधारणा) अधिनियम कल 5 (क), 9 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन,पुढील कारवाई कोतवाली पोस्टे करीत आहे.

               सदरची कारवाई मा.श्री. राकेश ओला पोलीस अधीक्षक,अहमदनगर, मा. श्रीमती स्वाती भोर मॅडम,अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर,अतिरीक्त कार्यभार अहमदनगर,श्री.अनिल कातकाडे उपविभागीय पोलीस अधिकारी,नगर शहर, श्री.अनिल कटके पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे  पोसई/सोपान गोरे,सफौ/मनोहर शेजवळ,पोहेकॉ/संदीप पवार,बापुसाहेब फोलाणे,पोना/संदीप घोडके,पोना/शंकर चौधरी,पोना/सचिन आडबल व पोकॉ/योगेश सातपुते यांनी केलेली आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top