बालविवाह रोखण्यासाठी 80 पेक्षा जास्त अंगणवाडी सेविकांनी घेतली शपथ.
नगर प्रतिनिधी. (१७. नोव्हेंबर.) : बालविवाह थांबवणे हे मानवतेची नैतिक जबाबदारी स्वीकारून या अभियानामध्ये सहभाग घेऊन आपला परिसर बालविवाह मुक्त करावा असा प्रबोधन करताना एकात्मिक बालविकास नगर ग्रामीण भागाचे बाल विकास प्रकल्प अधिकारी रफिक सय्यद यांनी आपल्या सानिध्यात येणाऱ्या सर्व अंगणवाडी सेविकांना सांगितले. तसेच शासनाने आपल्यावर सुद्धा जबाबदारी बालविवाह थांबवण्यासाठी दिली आहे. ती प्राथमिकता म्हणून आपण फक्त चाईल्ड लाईनच्या 1098 या मोफत क्रमांक वर सुद्धा माहिती देऊन आपल्या परिसरातील बालविवाह होणारे किंवा झालेल्या पीडित बालिकेची सुटका करू शकतो. सविस्तर माहिती अशी की, दिनांक 17 नोव्हेंबर 2022 रोजी चाईल्ड लाईनच्या दोस्ती सप्ताह औचित्य साधून चाईल्ड लाईन आणि उडान बालविवाह प्रतिबंधक यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपळी उज्जीन या बीट मधील 80 पेक्षा जास्त अंगणवाडी सेविकांना प्रतिबंधक अभियानाविषयी माहिती दिली. प्रत्येकी अंगणवाडी सेविका मागे दहा किंवा पंधरा पेक्षा जास्त किशोर आणि मुलीची गट असतो. त्यामुळे प्रत्येकी या गटांना बालविवाह विषयी जनजागृती करून यांच्या अंतर्गत येणाऱ्या 1000 पेक्षा जास्त किशोरवयीन मुलींपर्यंत माहिती उडान अभियानाविषयी आणि चाईल्ड 1098 या हेल्पलाइन क्रमांकवर माहिती अंगणवाडी सेविकाच्या माध्यमातून दिली जाणार आहे. तसेच त्यांच्यासोबत त्यांच्या संदर्भात येणाऱ्या प्रश्न संदर्भात सुद्धा चर्चा करून उडान बालविवाह प्रतिबंधक अभियानामध्ये किंवा चाईल्ड हेल्प- लाइनवर माहिती देणार आहेत. यावेळी चाईल्ड लाईन चे केंद्र समन्वयक, महेश सूर्यवंशी सरांनी चाईल्ड लाईनची सविस्तर माहिती देऊन, बालविवाह मुळे होणारे आरोग्य आणि शिक्षणाचा संदर्भातील दुष्परिणाम बद्दल त्यांना माहिती दिली व जागृत केले. याच प्रकारे मुलांचे समन्वयक प्रवीण कदम यांनी बालविवाह थांबवण्यासाठीची भूमिका आपली कशी असावी तसेच इतर कोणत्या यंत्रणा बाल युवा थांबवण्यासाठीची काम पाहतात याविषयी सविस्तर माहिती सदर अंगणवाडी सेविकांना देण्यात आली. तसेच सर्व अंगणवाडी सेविकांनी बालविवाह थांबवण्यासाठीची प्रथम आमची जबाबदारी म्हणून बालविवाह निर्मूलन करण्यासाठी शपथ घेतली.